ऑस्करमध्ये ‘नाटू-नाटू’ गाण्यावर नाचणार ‘ही’ अभिनेत्री

नवी दिल्ली : सध्या चित्रपटसृष्टीत कोणत्या सोहळ्याचे नाव गुंजत असेल तर ते फक्त आणि फक्त ऑस्करचे असेल. जगाच्या नजरा यावेळी होणाऱ्या ९५व्या ऑक्सर पुरस्काराकडे लागल्या आहेत. हा पुरस्कार यावेळी भारतासाठी खूप खास असणार आहे कारण यावेळी एसएस राजमौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्यालाही सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. यासोबतच बॉलिवूडची दीपिका पदुकोण मंचावर होस्ट करताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत सर्वजण या ऑस्कर पुरस्काराची आतुरतेने वाट पाहत आहेत. यासोबतच आणखी एक बातमी अशी आहे की, लॉरेन गॉटलीब ऑस्कर 2023 मध्ये आरआरआऱच्या नाटू-नाटू गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसणार आहे.\

95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा येत्या उद्या, 12 मार्च रोजी लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडणार आहे. तसेच हा पुरस्करा सोहळा 13 मार्च रोजी सकाळी 5:30 वाजता भारतात प्रसारित केला जाईल. सर्व भारतीय ‘आरआरआर’ च्या ‘नाटू-नाटू’ वर आशा ठेवून आहेत. हे गाणे ऑस्करमध्ये थेट सादर केले जाईल हे आधीच स्पष्ट झाले होते. त्यामुळे या ऑस्कर सोहळ्यात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर परफॉर्म करतील असा अंदाज चाहत्यांनी बांधला होता. याबाबत अद्याप कोणतीही अपडेट आली नसली तरी अमेरिकन अभिनेत्री आणि डान्सर लॉरेन गॉटलीबने जाहीर केले आहे की, ती ऑस्करमध्ये ‘नाटू-नाटू’ या गाण्यावर परफॉर्म करणार आहे.

लॉरेन गॉटलीबच्या घोषणेपूर्वी, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर ऑस्कर 2023 समारंभात ‘नाटू नातू’ वर डान्स करतील असा अंदाज चाहत्यांनी बांधला होता, मात्र, आता या पुरस्कार सोहळ्यात लॉरेनच या गाण्यावर डान्स करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लॉरेनने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्याच्या मागे हॉलिवूड लिहिले आहे. हा फोटो शेअर करण्यासोबतच लॉरेनने लिहिले की, ‘खास बातमी… मी ऑस्करमध्ये नाटू-नाटू गाणे सादर करत आहे… जगातील सर्वात प्रतिष्ठित व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी खूप उत्साहित आहे.’ लॉरेन गॉटलीबच्या या पोस्टने सर्वांना आनंद झाला आहे.

डान्सर आणि अभिनेत्री लॉरेन गॉटलीब ही परदेशी कलाकार असली तरी ती भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. लॉरेनने 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ABCD’ या चित्रपटातून तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात तिने गणेश आचार्य, प्रभू देवा, पुनीत पाठक आणि सलमान युसूफ यांसारख्या डान्सरसोबत स्क्रीन शेअर केली होती. यानंतर लॉरेनने ‘घोस्ट व्हिस्परर’, ‘ABCD 2’, ‘वेलकम टू कराची’ मध्येही काम केले आहे. याशिवाय ती अनेक रिअॅलिटी शोमध्ये पाहुणी म्हणून कलाकार म्हणून दिसली आहे. यासोबतच लॉरेनने भोजपुरी इंडस्ट्रीतही काम केले आहे.