घरताज्या घडामोडीपिंपरी चिंचवडमध्ये आढळली करोना संशयित महिला; ८ जण रुग्णालयात दाखल

पिंपरी चिंचवडमध्ये आढळली करोना संशयित महिला; ८ जण रुग्णालयात दाखल

Subscribe

पिंपरी चिंचवडमध्ये एक महिला करोना संशयित आढळली असून ८ जण रुग्णालयात दाखल झाले आहेत.

करोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. दरम्यान, करोना व्हायरस महाराष्ट्रात येऊन धडकला असून पुण्यातील करोनाग्रस्तांची संख्या पाच झाल्याची माहिती ताजी असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये करोना संशयित महिला आढळून आली आहे. ही महिला दुबईहून परतली होती. महिलेला नायडू रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

करोना संशयित महिला

पुण्यातील कुटुंब एका खासगी ट्रॅव्हल कंपनीसोबत दुबईला फिरायला गेले होते. त्यानंतर भारतात जेव्हा ते आले, त्यांनी पुण्यातील रुग्णालयात आपली वैद्यकीय तपासणी केली. या वैद्यकीय तपासणीत त्यांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, या संशयित महिलेवर नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या महिलेची वैद्यकीय तपासणी केली असून त्यांचे दुपारपर्यंत अहवाल प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात ४० जण दुबई येथे पर्यटनासाठी गेले होते. १ मार्चला ते भारतात परतले. त्यांपैकी एकाला त्रास झाल्यामुळे ८ मार्चला त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. करोना चाचणी सकारात्मक आल्याने त्यांना नायडू रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.


हेही वाचा – करोना संशयिताचा भारतातला पहिला मृत्यू


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -