घरCORONA UPDATECorona Live Update: कल्याण-डोंबिवलीत रुग्ण वाढीचा आलेख उंचावतोय

Corona Live Update: कल्याण-डोंबिवलीत रुग्ण वाढीचा आलेख उंचावतोय

Subscribe
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्ण वाढीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. २४ तासांत सर्वाधिक ५८० रुग्णांची नोंद झाली तर ६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गुरुवारी नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये  कल्याण २८२, डोंबिवली २४६, टिटवाळा, मांडा, पिसवली ५२ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे महानगर पालिका क्षेत्राचा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १० हजार ९३१ वर पोहोचला आहे. समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत ५ हजार ५४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ५ हजार २१९ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहे. दररोज मृतांची संख्या वाढत असून आतापर्यंत १६४ जणांचा मृत्यू झाला आहे.


वसई तालुक्यात बुधवारी २२१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका हद्दीत नवे २१२ रुग्ण आढळले आहेत. तर चौघांचा मृत्यू झाला आहे.  ग्रामीण परिसरात नवे ९ रुग्ण आढळून आले असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. महापालिका हद्दीतील कोरोनाबाधितांची संख्या ६ हजार ८११ इतकी झाली असून १३४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण परिसरात कोरोनाबाधितांची संख्या ३२५ वर गेली असून त्यातील नऊ जणांचा जीव गेला आहे.

- Advertisement -

ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याचे कोरोना या आजाराने गुरुवारी दुपारी निधन झाले आहे. ठाणे पोलीस दलात कोरोनाने मृत झालेल्या पोलिसांची संख्या ५ झाली असून ६१५ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे.

कासारवडवली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार यांना त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना प्रथम होरायझम प्राईम या रुग्णालयात १ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोनाची तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आला होता. बुधवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडली असता त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तसेच त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपी देखील सुरू होती, गुरुवारी दुपारी उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले, अशी माहिती कासारवाडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली. ठाणे पोलीस दलात कोरोनाने निधन झालेल्या पोलिसांची संख्या ५ झाली आहे. ठाणे पोलीस दलात कोरोना बाधितांची संख्या ६१५ असून त्यात अधिकारी यांच देखील समावेश आहे. त्यापैकी अनेक जण बरे होऊन कर्त्यव्यावर हजर देखील झालेले आहेत.

- Advertisement -

मुंबईत २४ तासांत कोरोनाचे १ हजार २८२ नवे रुग्ण आढळले असून ६८ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ८८ हजार ९९५वर पोहोचला असून आतापर्यंत यापैकी ५ हजार १२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


धारावी आणि माहिम-दादर या महापालिकेच्या जी उत्तर विभागातील धारावी विधानसभा क्षेत्रात कोरेानाचे रुग्ण नियंत्रणात येत असले तरी दादर-माहिम विधानसभा क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्ण आढळूनच येत आहे. त्यामुळे या विभागातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जाखादेवी येथील जागेत उभारण्यात येणाऱ्या उपचार केंद्रा ऐवजी दादरमधील कामगार स्टेडियम येथे कोविडचे उपचार केंद्र अर्थात आयसोलेशन सेंटर उभारण्याची मागणी गुरुवारी झालेल्या बैठकीत आमदार सदा सरवणकर यांनी महापालिकेकडे केली आहे. त्यामुळे ही सुविधा उपलब्ध झाल्यास येथील रुग्णांवर दादरमध्येच उपचार करता येतील.

दादर – माहिम विभागातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शिवसेना विभागप्रमुख आणि आमदार सदा सरवणकर यांनी जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. या बैठकीत आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, जी-उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष वसंत नकाशे, जी-दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष समाधान सरवणकर यांच्यासह विभाग संघटक शशी फडते, विधानसभा समन्वयक  राजु पाटणकर, उपविभागप्रमुख भाई परब, अभिजीत राणे,शाखाप्रमुख संदिप देवळेकर, अजित कदम, यशवंत विचले, शाखा समन्वयक कैलाश पाटील, अजय कुसुम, मिलींद तांडेल (शाखा समन्वयक) आदी उपस्थित होते.

मागील काही दिवसांपूर्वी श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाच्यावतीने जाखादेवी प्रसुतीगृहाच्या जागेवर कोरोना उपचार केंद्र उभारण्यात येणार आहे. या स्थानिकांचा होणारा विरोध लक्षात  घेता सरवणकर यांनी यासाठी दादरमधील कामगार स्टेडियमचा पर्याय सुचवला आहे. या जागेवर ५०० खाटांचे उपचार केंद्र उभारता येवू शकते,असे सरवणकर यांनी सांगितले. त्यामुळे हा पर्याय योग्य असल्याचे मान्य करत दिघावकर यांनी यादृष्टीकोनातून आपण प्रयत्न करु असे आश्वासन त्यांच्या शिष्टमंडळाला दिले.

यावेळी दादर-माहिममध्ये वाढणाऱ्या कोरेाना रुग्णाबाबत  सरवणकर यांनी विभागात आरोग्य शिबिरांच्या संख्येत वाढ करण्याची तसेच  कोरोना चाचणी शिबिरांचे आयोजन करण्याची मागणी केली. या दोन्ही मागण्या दिघावकर यांनी मान्य केल्याचे सरवणकर यांनी सांगितले. कोविड-19 च्या प्रभावी उपचारात  रेमडेसिवीर याइंजेक्शनचा जी-उत्तर विभागासाठी स्वतंत्र साठा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली असून  सहाय्यक आयुक्त यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन याबाबतची उपायोजना करण्यात येईल दिले.आश्वासन दिले. याबरोबरच घरोघरी जाऊन ‘फिव्हर चेक’ करण्यासाठी पथके कार्यान्वित करणे आणि  दादर – माहिम येथील लोकांची विभागातच क्वारंटाईन  करण्याची सुविधा विभागांतर्गत उपलब्ध  करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.आवश्यक कार्यवाहीची मान्यता दिली.


पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना डिस्चार्ज दिला आहे. मुरलीधर मोहोळ यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते.


राज्यात दिवसभरात ६ हजार ८७५ कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून २१९ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २ लाख ३० हजार ५९९वर पोहोचला असून आतापर्यंत ९ हजार ६६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


धारावीत आज ९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार ३४७वर पोहोचला आहे. तर दादरमध्ये २३ आणि माहिममध्ये १७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे दादरमधील कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ६७ तर माहिमधील १ हजार ३१६वर पोहोचला आहे.


औरंगाबादमध्ये उपचारानंतर ५ बाधितांचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा कहर कायम असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील पाच कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती शासकीय रुग्णालय घाटी येथील प्रशासनाने गुरुवारी दिली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल ३३५ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. (सविस्तर वाचा)


कोरोनाग्रस्त असलेल्या संशयावरून चालत्या बसमधूम मुलीला फेकले आणि…

देशभरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस सुरू असताना उत्तर प्रदेशातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. कोरोना संसर्ग झाल्याच्या संशयावरून कंडक्टरने उत्तर प्रदेशात एका बसमधून प्रवास करणार्‍या दिल्लीतील १९ वर्षीय मुलीला चालत्या गाडीतून बाहेर ढकलून दिले. यामुळे मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. दिल्ली महिला आयोगाने याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांना नोटीस बजावली आहे. महिला आयोगाने पोलिसांना १५ जुलैपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. (सविस्तर वाचा)


कोरोनाग्रस्त महिलेचा रुग्णालयातून पळ

कोरोनाग्रस्त महिलेने रुग्णालयातून पळ काढल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्याच्या तळेगावमध्ये एका ४५ वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेने रुग्णालयातून पळ काढल्याचे समोर आले आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळच्या सुमारास घडली असून दीड तासानंतर तिला ताब्यात घेण्यात यश आले आहे आणि पुन्हा कोविड सेंटरमध्ये दाखल केले आहे. (सविस्तर वाचा)


देशात पुन्हा एकदा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात २४ हजार ८७९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४८७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ६७ हजार २९६ वर पोहोचली असून मृतांची संख्या २१ हजार १२९ झाली आहे. तसेच २ लाख ६९ हजार ७८९ active केसेस असून ४ लाख ७६ हजार ३७८ जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


आतापर्यंत १ कोटी ७ लाख ४० हजार ८३२ जणांची कोविड टेस्ट करण्यात आली आहे. यापैकी २ लाख ६७ हजार ६१ जणांची बुधवारी तपासणी करण्यात आली आहे.


राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार ६०३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १९८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख २३ हजार ७२४वर पोहोचला असून मृतांचा आकडा ९ हजार ४४८ झाला आहे. तसेच दिलासा देणारी बाब म्हणजे २४ तासांत ४ हजार ६३४ रुग्ण बरे होऊ घरी गेले असून आतापर्यंत १ लाख २३ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रिकव्हरी रेट ५५.६ टक्के एवढा आहे. सध्या राज्यात ९१ हजार ६५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -