घरCORONA UPDATEBlog: 'कोरोनाला घाबरू नका' वाचा निगेटिव्ह झालेल्या रुग्णाचा अनुभव

Blog: ‘कोरोनाला घाबरू नका’ वाचा निगेटिव्ह झालेल्या रुग्णाचा अनुभव

Subscribe

कोरोना व्हायरसचा संपुर्ण कुटुंबाला संसर्ग झाल्यानंतर त्यातून बाहेर पडलेल्या शिल्पा पटवर्धन यांचा स्वानुभव...

तर झालं असं की २१ मार्च पासून आम्ही म्हणजे मी, माझे बाबा, सागर आणि समीर घरात होतो. सोसायटीने भाजी, फळे यांची सोय केलेली असल्याने कुठेही बाहेर पडण्याची गरज नव्हती. आणि संजयला बँकेत जावं लागत असल्याने आम्हाला थोडी भिती वाटत होती. अगदी आमच्या समोरच्या घरातही जाणे आम्ही टाळत होतो आणि गेलो तरी कुठल्याही गोष्टीला हात न लावणे, हे आम्ही पाळत होतो. सगळं सुरळीत चालू असताना अचानक २६ एप्रिलला संजयला ताप आला. लगेच सोसायटीतील डॉ. अनघा यांचं औषध आणलं. पूर्ण काळजी घेऊन सुद्धा का ताप आला या विचाराने आधी हतबलता आली मग राग आणि चीडपण आली. पण ३ दिवसात त्याचा ताप गेला आणि २९ ला मला ताप आला.

मला रोज संध्याकाळी ६ – ६.१५ ला घड्याळ लावल्याप्रमाणे ताप येत होता. अगदी ४ तारखेपर्यंत. आणि पुन्हा संजयला २ तारखेला ताप आला. आता मात्र डॉक्टरांनी CBC, maleria, आणि precaution म्हणून covid टेस्ट करायला सांगितली. भिती वाटली पण घेतली करून. आणि दुर्दैवाने रिपोर्ट positive आला. आणि कुठेही जागा नसल्याने वाट बघून तो ३० तासांनी रहेजा हॉस्पिटल मध्ये ५ तारखेला admit झाला. तो positive आल्याने आमचीसुद्धा घाईने टेस्ट करावी लागली. रुपारेलमध्ये thyrocare च्या कॅम्प मध्ये ५ तास प्रतीक्षा करत टेस्टचं दिव्य पार केलं. ताप, सर्दी, खोकला काही नसल्याने रिपोर्ट negative येतील असं वाटत होतं… पण दुर्दैव!! आमचे सगळ्यांचे रिपोर्ट २ दिवसांनी म्हणजे ८तारखेला positive आले.

- Advertisement -

तो पर्यंत बाबांना ताप आला होता. वेड्यासारखं वागत होते. खाणं पिणं बंद केलं. थरथरायला लागले. आम्ही सगळे positive लक्षणं नसली तरी, आणि संजय हॉस्पिटल मध्ये!! emergency आलीच तर करायचं काय या विचाराने घाबरलो आणि संदीप देशपांडे यांच्या मदतीने रातोरात seven hills hospital मध्ये admit झालो. वाटलं, आता हॉस्पिटलमध्ये आलो.. आता दुर्दैवाचे दशावतार संपतील. पण छे. आम्हाला बेड मिळायला पहाटेचे ५ वाजले. ते सुद्धा एका झोपलेल्या माणसाला उठवून बाबांना आणि सागरला एका ठिकाणी जागा दिली. आणि मला दुसऱ्या ठिकाणी. जे बुकिंग पासून आम्ही सांगत होतो त्यातलं काही होईना. बाबा तर अजूनच वेड्यासारखं करायला लागले. हातपाय आपटायला लागले. उभे राहून तिथेच urine pass करायला लागले आणि मग मात्र सागर आणि मी गोंधळलो. काय करायचं काहीच सुचत नव्हतं.

प्रायव्हेट मध्ये कुठेच जागा नव्हती. ते help desk वरचे म्हणायला लागले ४, ५ तास थांबा आम्ही adjust
करून देतो पण काही होईना. त्यात आमच्या विंगच्याच एका माणसाने suicide केलं आणि आमची जाम वाट लागली. यातच ९ तारीख गेली, १० तारीख पुन्हा नवीन आव्हाने उभी असलेली होती. बाबांचं चालूच होते. वैतागलो होतो. बरं, ज्यासाठी Hospital मध्ये घाईने आलो ती treatment काहीच नव्हती. कारण बाबांचा ताप उतरला होता. आणि त्यांना जे काही होत होते ते psychological disorder मुळे. ज्याचा covid शी काही संबंध नव्हता. तोपर्यंत जे काही होईल ते होवो, पण जिथे assistance मिळेल अशा ठिकाणी atleast बाबांना ठेवलं तर आम्ही लवकर बाहेर पडू आणि त्यांना लवकर बरं वाटेल अशी मनाची तयारी झाली.

- Advertisement -

सगळ्या top-class च्या ओळखींचा वापर करूनही काही होईना. शेवटी मनाची तयारी केली की इथेच राहायचं आहे. आता १४ दिवस. ओळखिंमुळे बाबांना relaxation साठी एक गोळी मिळाली आणि बाबा थोडे सावरले आणि आम्हीही दोघं थोडे शांत झालो. Covid ची परत टेस्ट केली. हळूहळू adjust झालो. म्हटलं तर सोय चांगली होती. प्रत्येकाला separate cot, 2 breakfast, 2 जेवण, सतत गरम पाणी सगळं मिळत होत. जो स्टाफ round घेण्यासाठी यायचा तो खूप छान बोलत होता. प्रेमाने चौकशी करत होते. आम्ही निघायच्या वेळी खुर्च्यापण दिल्या प्रत्येकाला बसायला. पण आपल्या लोकांना सुविधा कशा वापरायच्या ते कळत नाही. एवढं चांगलं मिळून सुद्धा टॉयलेट, बाथरूम साफ ठेवता येत नव्हतं. त्या सगळ्याचा कंटाळा आला.

अचानक हॉस्पिटल management कडून फोन आला. तुमच्या घरात संडास बाथरूम आहे का? किती बेडरूमचा फ्लॅट आहे. तर मी सांगितलं २ बेडरूम आहेत, २ टॉयलेट्स आहेत. मग ते म्हणाले तुम्ही तुमची घरी सोय करू शकता का? म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे, अशा लोकांना आम्ही हॉस्पिटलमध्ये आणू शकू. आत्ताच्या नवीन guidelines नुसार आम्ही देऊ का डिस्चार्ज??? मी म्हणाले द्या. आणि मग आम्ही अचानक घरी आलो. कारण treatment as such काहीच नव्हती. Multivitamin tablet, c vitamin tablet, pan 40 एवढंच. एवढं घरी राहून पण करू शकतो.

आम्ही ज्या मजल्यावर होतो तिथल्या अंदाजे १२० जणांपैकी ३ जणांना ऑक्सिजनची गरज होती. बाकी जवळ जवळ ८० जण asymptomatic होते. अगदी १० एकजण थोडे खोकत होते. बाकी काही नाही. तेव्हा कोविड १९ ला घाबरु नका. गरम पाणी, लिंबू पाणी, सुंठ पावडर, काढा याचा मारा ठेवा. बातम्या बघणं बंद करा. हात धुवा. घाबरून जाऊ नका. साधं सात्विक जेवण जेवा. काळजी घ्या..


लेखिका शिल्पा पटवर्धन यांचा स्वानुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -