घरमहाराष्ट्रCorona: अनिश्चित काळासाठी पुण्यातील मार्केटयार्ड १० एप्रिलपासून बंद!

Corona: अनिश्चित काळासाठी पुण्यातील मार्केटयार्ड १० एप्रिलपासून बंद!

Subscribe

१० एप्रिलपासून फळे, भाजीपाला, कांदा-बटाट्याचा घाऊक व्यापार पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्याचा मार्केटयार्ड आडते असोसिएशनचा निर्णय

पुण्यातील काही भाग कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना या रोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही चिंताजनक आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील मार्केटयार्ड अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येणार आहे. उद्यापासून म्हणजेच १० एप्रिलपासून फळे, भाजीपाला, कांदा-बटाट्याचा घाऊक व्यापार पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्याचा निर्णय मार्केटयार्ड आडते असोसिएशनने घेतला आहे.

या मार्केटयार्ड परिसरात कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेता याठिकाणी कर्फ्यू लावण्यात आला आहे. मार्केटयार्ड परिसर सील करण्यात आल्याने बाहेरून येणाऱ्या मालाची फक्त आवक होत आहे. यामुळे घाऊक व्यापाऱ्यांनाच इथे खरेदीसाठी परवानगी नसून बाहेरुन आलेल्या ट्रक, टेम्पोंना मार्केटयार्ड परिसरात प्रवेश देण्यात येत आहे.

- Advertisement -

संसर्ग रोखण्यासाठी सर्व परिसर सील करुन कर्फ्यू

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढला असल्यामुळे सर्व परिसर सील करुन कर्फ्यू सुद्धा लावला आहे. त्यामुळे जोपर्यंत परिस्थिती आटोक्यात येत नाही, तोपर्यंत संपूर्ण गुलटेकडी मार्केटयार्डमधील सर्व व्यवहार बंद ठेवावेत, अशी विनंती आडते असोसिएशनने कृषी उत्पन्न बाजार समितीला केली आहे.


Lockdown : पत्नी माहेरी अडकल्यामुळे पतीने केली आत्महत्या!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -