Coronavirus Live Update: भारतात करोना बाधितांची संख्य ४९९ वर

Change the contractor of Art Gallery Kovid Hospital Demand of social activist Ajay Sawant
आर्ट गॅलरी कोविड रुग्णालयाचा ठेकेदार बदला सामाजिक कार्यकर्ते अजय सावंत यांची मागणी

आज दिवसभरात देशातील विविध ठिकाणी नव्या करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्यामुळे आता ४९९ संख्या झाली आहे. आज तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटका, गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि बिहार राज्यात नवे रुग्ण आढळले आहेत. तर एकूण मृत्यूंची संख्या दहावर गेली आहे.


 

राज्यात संध्या मुंबई आणि पुण्यात मोठ्या प्रमाणात करोनाचे रुग्ण आढळत होते. मात्र आता सांगलीतही चार रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. सौदीहून परतलेल्या चार जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.


 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात या क्षणापासून संचारबंदी लागू केली आहे. त्याप्रमाणे आता वाहतुकीवर निर्बंध आले आहेत. वाचा या संचारबंदीमध्ये काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार?

पुढील गोष्टी बंद –

 • खासगी वाहने
 • बस
 • इतर सर्व वाहनांची वाहतूक बंद
 • रस्त्यावरील वाहतूक पुर्णपणे बंद राहील.

काय सुरु राहणार

 • धान्याची वाहतूक आणि धान्याची दुकाने सुरु राहणार
 • बेकरी
 • पशू खाद्य
 • पाळीव प्राण्यांबद्दलची दुकाने उघडी राहतील
 • औषधाची दुकाने, दवाखाने उघडे राहणार
 • कृषी उद्योग आणि त्यासंबंधी दुकाने आणि वाहतूक सुरु राहिल.
 • सर्व धर्मीयांची धार्मिक स्थळांमध्ये फक्त पुजारी, मौला-मौलवी आणि पाद्री यांनाच एंट्री असेल बाकी सर्वांसाठी मंदिरे बंद

अत्यावश्यक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाच्या सूचना

 • टॅक्सीत चालक अधिक दोन प्रवासी
 • रिक्षात चालक अधिक एक प्रवासी

 


 

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर जनतेने एक दिवसाचा कर्फ्यू पाळला खरा. मात्र आज सकाळी पुन्हा मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. त्यामुळे सकाळी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बंद करण्यात आला होता. मात्र गर्दी ओसरल्यानंतर हा महामार्ग पुन्हा एकदा सुरु करण्यात आला आहे.


करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र येत्या ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी मध्मरात्रीपासून राज्यात कलम १४४ लागू करण्यात आला आहे. तसेच मुंबईत देखील लोकल सेवा बंद करण्यात आली आहे.