घरमहाराष्ट्रगुन्हेगारासोबत प्रेम विवाह करणाऱ्या बहिणीचा चुलत भावाने केला खून

गुन्हेगारासोबत प्रेम विवाह करणाऱ्या बहिणीचा चुलत भावाने केला खून

Subscribe

गुन्हेगारासोबत प्रेम विवाह करणाऱ्या चुलत बहिणीचा खून भावाने केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. ऋतुजा विकी वाघ असे खून झालेल्या बहिणीचे नाव आहे. तर संतोष रोहिदास भोंडवे असे आरोपी चुलत भावाचे नाव आहे. मयत ऋतुजा ही आईला नेहमी मारहाण करायची. आज देखील तिने आईला मारहाण केली. तेव्हा, आईने पुतण्या संतोषला आवाज दिला. त्याने वैतागून चुलत बहिणीचा गळा घोटून खून केला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत ऋतुजा हिने काही दिवसांपूर्वी गुन्हेगारासोबत प्रेम विवाह केला होता. तेव्हा पासून ऋतुजा कधीतरी आईकडे राहण्यास येत असे. परंतु, ती नेहमी गुन्हेगार पतीसोबत असायची. दळवीनगर येथे आल्यानंतर आजी तिला तू इथे येत जाऊ नकोस असे सांगायची. यातून त्याच्यात वाद होत होते. ऋतुजा आईला मारहाण करायची. आज देखील ऋतुजा घरी आली तेव्हा त्यांच्यात किरकोळ वाद झाले होते. मयत ऋतुजाच्या आईने शेजारीच राहणाऱ्या पुतण्याला संबंधित घटना सांगितली.

- Advertisement -

आरोपी पुतण्या संतोषने तिथेच ठरवले की आज ऋतुजाला जिवंत मारून टाकायचे, असे म्हणत तो घरात आला. अगोदर त्याने ऋतुजाला हाताने मारहाण केली आणि नंतर गळा घोटून खून केला. दरम्यान, मयत ऋतुजाला आई आणि आजी वैतागले होते. तिने गुन्हेगारासोबत प्रेम विवाह केल्याने कुटुंबिय नाराज होते. ऋतुजा नेहमीच दोघींना मारहाण करत होती. हे सर्व चुलत भाऊ आरोपी संतोषला माहीत होते, त्यामुळेच त्याने टोकाचे पाऊल उचलत खून केला. चिंचवड पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -