घरमुंबईधावत्या लोकलमध्ये बाटली फेकून मारल्यामुळे महिला जखमी 

धावत्या लोकलमध्ये बाटली फेकून मारल्यामुळे महिला जखमी 

Subscribe

धावत्या लोकलमध्ये बाटली फेकून मारल्याने एक महिला जखमी झाली असल्याची घटना घडली आहे. मात्र, याप्रकरणी रेल्वे पोलिसांकडे याबाबत अद्याप कोणतीही तक्रार दाखल नसल्याचे समोर आले आहे.

मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्या महिला प्रवासी असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा एका घटनेवरून समोर आले आहे. रात्रीच्या वेळेस चालत्या लोकलमधील महिलांच्या डब्यावर बिअरची बाटली भिरकावण्याचा प्रकार घडला असून या घटनेत एक महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. आशा विनोद पाटील असे या महिलेचे नाव आहे. या दुर्घटनेत महिलेच्या हाताला आणि डोक्याला जबर मार लागला असून हाताला आठ टाके पडले आहेत. या दुर्घटनेला ठाणे रेल्वे पोलिसांनी दुजोरा दिला आहे.

नेमके काय घडले?

डोंबिवली येथील देसले पाडा येथे राहणाऱ्या आशा यांनी शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ठाणे स्थानकातून डोंबिवलीला जाणारी लोकल पकडली. लोकलमध्ये गर्दी असल्याने त्या आणि अन्य महिला प्रवासी दरवाज्याच्या आतील बाजूस उभ्या होत्या. त्याचवेळी लोकल ठाणे आणि कळवा खाडी पुलाजवळ पोहचताच अचानक रिकामी दारूची बाटली हातावर आदळली. या दुर्घटनेत हाताला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. या दुर्घटनेची माहिती कळवा रेल्वे सुरक्षा दलाला देण्यात आली. दरम्यान, उपचारासाठी कळवा रुग्णालयात गेले असता सुरुवातीला त्यांनी जे जे रुग्णलयात जाण्यास सांगितले. मात्र, काही वेळानंतर पैसे घेऊन उपचार करण्यासाठी त्यांनी तयारी दर्शवल्याची माहिती आशा यांचे पती विनोद पाटील यांनी दिली आहे. मात्र, याप्रकरणी रेल्वे पोलिसांकडे याबाबत अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची माहिती ठाणे रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सावधान! लोकलच्या महिला बोगीवर फेकल्या जातायत बिअरच्या बाटल्या

हेही वाचा – स्तनदा मातांना लोकलमध्ये राखीव जागा; राज्य महिला आयोगाची मागणी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -