घरमहाराष्ट्रCCTV: मेट्रोच्या कामावेळी १२० टनाची क्रेन कोसळली

CCTV: मेट्रोच्या कामावेळी १२० टनाची क्रेन कोसळली

Subscribe

क्रेन पडण्याचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

मेट्रोच्या कामासाठी लागणारी तब्बल १२० टन वजनाची क्रेन कोसळली. पिंपरी-चिंचवडच्या नाशिकफाट्याजवळ ही घटना घडली आहे. पुणे मेट्रोचे काम सुरु असताना ही घटना घडली आहे. त्याठिकाणावरुन प्रवासी गाड्या जात होत्या फक्त दोन सेकंदांचा फरक झाल्याने मोठा अनर्थ टळला. क्रेन पडण्याचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

- Advertisement -

कामा दरम्यान क्रेन कोसळली

महा मेट्रोद्वारे निर्माणाधीन पिंपरी-चिंचवड रस्त्यावर सुरु असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या नाशिक फाटा चौक, जे.आर.डी टाटा उड्डाणपूलाखाली शनिवारी दुपारच्या सुमारास पायलिंग रिंगचे (खोदकाम) काम सुरु होते. जमीन भूसभुशीत असल्यामुळे पायलिंग रिंग मशिन कोसळली असे स्पष्टीकरण महामेट्रोकडून देण्यात आले आहे. जवळपास १२० टन वजन इतकी पायलिंग रिंग (क्रेन) जे.आर.डी टाटा उड्डाणपूल येथे कामासाठी आणण्यात आली होती. याठिकाणी पिलरसाठी खोदकाम सुरू होते जमीन भूसभुशीत झाल्याचा अंदाज न आल्यामुळे ही घटना घडली. असे म्हामेट्रोच्या वतीने सांगण्यात आले आहे

वाहतूकीवर परिणाम

या घटनेची माहिती मिळताच महा मेट्रोचे जलद कृती पथक घटनास्थळी पोहोचून ग्रेड सेप्रेटर येथून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सर्विस रोड आणि भोसरी मार्गाने वळविली. पायलिंग रिंगचे वजन हे १२० टन असल्यामुळे साध्या हायड्रो क्रेनने ही उचलणे शक्य नव्हते. त्याकरता मेट्रो प्रशासनाला मेट्रोच्या दुसऱ्या कार्यस्थळवरून २०० टन वजन असलेली क्रेन आणावी लागली. या क्रेनच्या सहाय्याने पायलिंग रिंग मशिन उभी करून ट्राफिक पूर्ववत करण्यात आले.

- Advertisement -

मोठा अनर्थ टळला

दरम्यान ही घटना नाशिक फाट्याजवळील एका हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे . एकापाठोपाठ चार कार, दोन रिक्षा आणि एक पीएमपीची बस नाशिकफाट्यावरुन पिंपरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आणि फक्त दोन सेकंदांचा फरक झाला आणि ही क्रेन कोसळली थोडक्यात मोठा अनर्थ टळला. असा या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -