घरमनोरंजनअमोल कोल्हेंच्या नावाने फेक अकाऊंट तयार करून पैसे मागण्याचा प्रकार; पोलिसांचा सावधानतेचा...

अमोल कोल्हेंच्या नावाने फेक अकाऊंट तयार करून पैसे मागण्याचा प्रकार; पोलिसांचा सावधानतेचा इशारा

Subscribe

अमोल कोल्हे यांनी स्वतः याबाबत माहिती दिली असून त्यांनी काही स्क्रिनशॉट देखील शेअर केले आहेत. सध्या अमोल कोल्हेंची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे अभिनयासोबतच राजकारणातही मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. दरम्यान, आता त्यांच्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाऊंट तयार करून पैसे मागितले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमोल कोल्हे यांनी स्वतः याबाबत माहिती दिली असून त्यांनी काही स्क्रिनशॉट देखील शेअर केले आहेत. सध्या अमोल कोल्हेंची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी फेक अकाऊंटचा एक स्क्रिनशॉट शेअर करत माहिती देखील दिली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलंय की, “@kdr.amol या नावाने Instagram profile बनवून लोकांना मेसेज पाठवले जात आहेत आणि पैशाची मागणी केली जातेय. फोटो नाव सेम दिसत असलं तरी या फेक प्रकारापासून सावध रहा. माझ्या व्हेरिफाईड अकाउंटचं इंस्टा युझरनेम @amolrkolhe असं आहे. @kdr.amol या फेक प्रोफाईल संदर्भात रितसर तक्रार केलेली आहे.” असं लिहित डॉ. अमोल कोल्हे सर्वांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

- Advertisement -

खरंतर, अमोल कोल्हे यांच्या नावाने एक फेक अकाऊंट तयार करून त्यावरून 20000 रूपये ऑनलाईन पाठवण्याची मागणी केल्याचं दिसत आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी ही पोस्ट शेअर करत सर्वांना अशा फ्रॉड प्रकारापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, सध्या ऑनलाईन फ्रॉडचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असून फेक अकाऊंट तयार करून पैशांची मागणी करणारे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे या प्रकारांपासून सावध राहण्याचे सल्ले वारंवार पोलिसांकडून दिले जातात.


हेही वाचा :फडणवीसांची राज्यातच नाही तर केंद्रात एन्ट्री, मोदींनी दिली मोठी जबाबदारी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -