घरमहाराष्ट्रबिबट्या तो बिबट्याचं, अधू असूनही केली कुत्र्याची शिकार; व्हिडीओ व्हायरल

बिबट्या तो बिबट्याचं, अधू असूनही केली कुत्र्याची शिकार; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

पुण्यातील हिंजवडी येथे असलेल्या नेरे गावातील एका बंगल्यात घुसून बिबट्याने कुत्र्याची शिकार केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हा बिबट्या एका पायाने अधू आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पुण्यातील हिंजवडी येथे बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा बिबट्या एका पायाने अधू आहे. पण तरीसुद्धा त्याने केलेल्या शिकारीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आयटी सिटी अशी ओळख असलेल्या हिंजवडीतील नेरे गावातील बंगल्यामध्ये घुसून या बिबट्याने शिकार केली आहे. या बंगल्याच्याआवारात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये या घटनेचे चित्रीकरण झाले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून स्थानिक नागरिकांच्या मनात धडकी भरली आहे.

बिबट्याने केलेल्या या शिकारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेरे गावात बिबट्याच्या वावरामुळे येथील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. तर शेतकरी सुद्धा या घटनेमुळे घाबरलेले आहेत. नेरे गावात असलेल्या बंगल्याच्या आवारात एका पाळीव कुत्र्याला बांधून ठेवण्यात आले होते. पण एका पायाने अधू असलेल्या या बिबट्याने बंगल्यात शिरून या कुत्र्यावर हल्ला केला. पण साखळी बांधलेली असल्याने हा कुत्रा आपला जीव वाचवू शकला नाही. तर बिबट्याने सुद्धा या कुत्र्याचा जीव घेत त्याला साखळीतून खेचून त्या ठिकाणाहून पाल काढला.

- Advertisement -

हेही वाचा – ब्रिटिश सरकारची खेळी, म्हणे कोहिनूर आमच्या ‘विजयाचं प्रतीक’

दरम्यान, मागच्या महिन्यात पुण्यातील चाकण एमआयडीसीमध्ये पहाटेच्या वेळी बिबट्याचे दर्शन झाले होते. हा बिबट्या मर्सडिज बेन्ज या आंतरराष्ट्रीय कंपनीत घुसल्याचे कंपनीमधील एका चालकाच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन बिबट्या असल्याची खात्री करून घेतली. तसेच त्यांनी याबाबत वनविभागाला कळवले होते. त्यावेळी जवळपास सात तासांच्या थरारानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले होते. चाकण एमआयडीसीत अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या असल्याने, या एमआयडीसीची आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख आहे. याच एमआयडीसीमधील मर्सडिज बेन्ज या आंतरराष्ट्रीय कंपनीत आज बिबट्याने शिरकाव केला होता. यामुळे एमआयडीसीसह आसपासच्या परिसरात खळबळ उडाली होती.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -