घरक्राइमआधारआश्रमाचा पालकच ठरला क्रूरकर्मा; अल्पवयीन मुलीवर अत्याचार

आधारआश्रमाचा पालकच ठरला क्रूरकर्मा; अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Subscribe

नाशिक : शहरातील पंचवटी भागातील हिरावाडी परिसरात असलेल्या आधार आश्रमात संतापजनक घटना घडली आहे. आश्रमात राहणार्‍या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची बाब समोर आली आहे. या आधारआश्रमात ३०हून अधिक विद्यार्थिनी राहतात. यातील एका अल्पवयीन मुलीने आधार आश्रमाच्या संचालकाने अत्याचार केल्याची तक्रार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात म्हसरूळ पोलीस ठाण्यात संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला तात्काळ अटकही करण्यात आली आहे.

राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या निवासासाठी आधार आश्रमांची उभारणी करण्यात येते. सामाजिक संस्थांची मदतीने ही आश्रम चालवली जातात. यात शासनामार्फत विद्यार्थ्यांच्या वसतीगृह तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात येते. अश्याच पद्धतीचे आधार आश्रम अंतर्गत वसतिगृह चालवले जाते. हिरावाडी परिसरातील मानेनगर भागात एका रो-हाऊस मध्ये हे वसतिगृह आहे. याच ठिकाणच्या संचालकानेच वसतिगृहातील १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची बाब समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

दरम्यान पोलिसांना घटनेची माहिती मिळताच संशयित संचालक हर्षल बाळकृष्ण मोरे यास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयता विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -