घरताज्या घडामोडीCruise Drugs Case: किरण गोसावी सरेंडर झाल्यानंतर आणखीन मोठी माहिती पंच प्रभाकर...

Cruise Drugs Case: किरण गोसावी सरेंडर झाल्यानंतर आणखीन मोठी माहिती पंच प्रभाकर साईल देणार

Subscribe

माझा कोणत्याही नेत्यांशी संपर्क नाही, मी एक स्वच्छ नागरिक आहे - प्रभाकर साईल

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात पंच असलेला प्रभाकर साईलने केलेल्या खळबळजनक आरोपामुळे याप्रकरणाला वेगळे वळण आले आहे. किरण गोसावीचा प्रभाकर साईल हा बॉडीगार्ड होता. आज प्रभाकर साईल दुपारी १ वाजता पत्रकार परिषद घेणार होता. मात्र काही कारणास्तव प्रभाकर साईलने थोडक्यात पत्रकार परिषद घेऊन आज सायंकाळी ६ वाजता सर्वांसोबत बोलून सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर देईल असे सांगितले. यादरम्यान प्रभाकर साईल असे देखील म्हणाला की, ‘किरण गोसावी सरेंडर झाल्यानंतर मी माझ्याकडे असलेले सर्व काही सांगेल.’

नक्की काय म्हणाला प्रभाकर साईल?

प्रभाकर साईल म्हणाला की, ‘माझ्या घरी सतत पोलीस जातायत. आमची चौकशी केली जातेय. बायकोला बोललो तू काही करू नकोस, पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नकोस. थोडे दिवस थांब दोन दिवसांचा कालावधी दे. तर मी माझ्या मित्राला काही होईल का? अशी विनंती केली. त्याने मला स्वाभिमानी रिपब्लिक पक्षाचे सोलापूरचे अध्यक्ष काळे यांच्याकडे तो घेऊन गेला. मी त्यांना सर्व मोबाईलमध्ये असलेली स्टोअरी सांगितली. आता मी याप्रकरणात पंच आहे, तर माझ्यावर काहीही होऊ शकत. मी आतून खूप घाबरलो होतो. मी सोलापूर गेलो. माझ्या कौटुंबिक प्रोब्लेम सगळ्यांना सांगितला आहे. जर आता माझ्या कुटुंबाला प्रोब्लेम होत असेल तर मी कोणासाठी जगायचे.’

- Advertisement -

‘नेत्यांशी माझे संबंध कसे काय असू शकतात. मी एक स्वच्छ नागरिक आहे. मी सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या ४० वर्षांपासून माझ्यावर आतापर्यंत एकही गुन्हा दाखल नाही. मी आता सर्व काही सत्य सांगितल्यामुळे मला बदनाम करण्याचा डाव चालू झालेला आहे. किरण गोसावींना सरेंडर होऊ देत मग मी माझ्याकडे असलेले सर्व काही सांगेल. माझे वकील द्या, मी सर्व काही बोलणे. संध्याकाळी ६ वाजता सगळ्या प्रश्नांची उत्तर देईन,’ असं प्रभाकर साईल म्हणाला.


हेही वाचा – Drugs Case: ‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटींकडून कोट्यावधी रुपये NCBने उकळले, नवाब मलिकांचा आरोप


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -