घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'त्या' तीन लाचखोरांना कोठडी; महिनाभरात भूमीअभिलेखचे 'इतके' अधिकारी कोठडीत

‘त्या’ तीन लाचखोरांना कोठडी; महिनाभरात भूमीअभिलेखचे ‘इतके’ अधिकारी कोठडीत

Subscribe

नाशिक : फायनल लेआउटमध्ये त्रुटी दाखवून शेजारील गटातील क्षेत्र गटात सरकून न देण्याच्या मोबदल्यात १० लाखांची मागणी करुन ३ लाख रुपये स्विकारल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकच्या तपासात समोर आले आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात त्र्यंबकेश्वर भूमीअभिलख कार्यालयाचा शिरस्तेदार, भू-करमापक आणि खासगी मोजणी व बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने तिघांना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

शिरस्तेदार दौलत नथू समशेर, भू-करमापक भास्कर प्रकाश राऊत, वैजनाथ नाना पिंगळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तक्रारदाराच्या पत्नीचे तळेगाव (ता.त्र्यंबकेश्वर) येथील क्षेत्राचे फायनल ले आऊट आहेत. या लेआउटची मोजणी करण्यासाठी तक्रारदाराने त्र्यंबकेश्वर भूमीअभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. तक्रारदार यांना शिरस्तेदार दौलत समशेर आणि भू-करमापक भास्कर राऊत यांनी खासगी मोजणी करणारा वैजनाथ पिंपळे यास मोजणीसाठी सागितले होते. दोघांनी फायनल ले आऊटमध्ये त्रुटी दाखवण्याचा आणि तक्रारदार यांचा गट शेजारील गटात सरकू न देण्याच्या मोबदल्यात खासगी इसम पिंपळे याच्या मध्यस्थीने १० लाखांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ६ लाख रुपये लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. त्यानुसार पथकाने शहानिशा करुन सापळा रचला. शिरस्तेदार व भू-करमापक यांच्या वतीने वैजनाथ पिंगळे यांनी स्वत:च्या ऑफिसमध्ये तक्रारदाराकडून ३ लाख रुपये स्विकारले. याप्रकरणी त्र्यंबकश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -
भूमी अभिलेख विभाग लाचखोरीत अव्वल 

मार्च महिन्याच्या सुरवातीलाच भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधिक्षकासह लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली होती. विभागाच्या गंगापूर रोड परिसरातील कार्यालयात ही कारवाई झाली होती. कार्यालयात इतकी मोठी कारवाई झालेली असूनही तेथील मस्तवाल झालेल्या आणखी एकाने लाचखोरी सुरूच ठेवली. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस त्यालाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाळ्यात घेतले. आणि आता त्र्यंबकेश्वर येथील तिघांना अटक झाल्याने आत्तापर्यंत भूमी अभिलेखचे ६ लाचखोर कोठडीत बंद झाले आहेत. या विभागात मोठ्या प्रमाणात अनागोंदी आहे तसेच मुद्दाम फेरफार करून दुरुस्ती करण्यासाठी पैशांची मागणी केली जाते अशी दबक्या आवाजात चर्चा कायमच होत आली आहे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाया झाल्याने ते उघड सत्य बनत चालल आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -