घरताज्या घडामोडीCyclone Tauktae: तौक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्राला तडाखा नाही - IMD

Cyclone Tauktae: तौक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्राला तडाखा नाही – IMD

Subscribe

तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा हा महाराष्ट्राला बसणार नाही, अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या वैज्ञानिक शुभांगी भुते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केली आहे. महाराष्ट्रापासून ३५० किमी दूर या चक्रीवादळाचा परिणाम असेल त्यामुळे याचा थेट परिणाम हा महाराष्ट्रात होणार नाही. समुद्र किनारपट्टीच्या लगतच्या भागात काही ठिकाणी वारे वेगाने वाहणे, तसेच काही ठिकाणी मुसळधार पाऊस इतका मर्यादित असा परिणाम असणार आहे. विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी या परिसरात वारे ताशी ६० किमी ते ७० किमी या वेगाने वाहतील असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. परिणामी काही ठिकाणी झाडे कोसळले, कच्ची घरे कोसळणे असा परिणामही होईल होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले. रविवारी हे चक्रीवादळ आणखी सक्रीय होणार आहे. तर १७ तारखेला गुजरातच्या वेरावल येथे हे वादळ धडकेल. मुंबईसह परिसरावर थोड्या अधिक प्रमाणात याचा परिणाम होऊ शकतो असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला. (Cyclone Tauktae will not impact directly to maharashtra coastal IMD mumbai clarified)

तोक्ते चक्रीवादळाचा परिणाम मुंबई, महाराष्ट्रावर काय ?

लक्षदीपमध्ये जेव्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले, तेव्हा मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तेव्हापासूनच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा, मच्छीमारांना अलर्ट दिला गेला. त्यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मच्छीमार परतले असल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या हे चक्रीवादळ गोव्यात धडकले असून येत्या २४ तासांमध्ये उत्तर कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी किनारपट्टीच्या परिसरात याचा परिणाम असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी परिसरात ३५० किमी दूर समुद्रात या चक्रीवादळाचा परिणाम असणार आहे. त्यामुळेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे ताशी ६० किमी ते ७० किमी या वेगाने वारे वाहतील. काही ठिकाणी या वाऱ्याचा वेग ताशी ९० किमीही जाऊ शकतो. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता गोव्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टीपासून जेव्हा हे चक्रीवादळ दूर जाईल तेव्हाचा याचा परिणाम जाणवेल. मुंबईसह रायगड, पालघर परिसरात वाऱ्याचा वेग अधिक असेल तर एखाद दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. हे चक्रीवादळ १८ तारखेला गुजरातचे विरावल क्रॉस करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

मुंबई परिसरात काय परिणाम ?

या चक्रीवादळाचा परिणाम हा येत्या २४ तासात जाणवेल. कारण चक्रीवादळ अधिक तीव्र होणार आहे. परिणामी रायगड, मुंबईत वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. सरासरी ताशी ६० किमी ते ७० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. परिणामी झाडांची पडझड आणि कच्ची घरे डॅमेज होण्याची शक्यता आहे. या काळात जिवीतहानी होऊ नये म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे. समुद्र खवळलेला राहणार आहे. तसेच उंच लाटा असणार आहेत.

रविवार पावसाळी वातावरण

समुद्र किनारी वाऱ्याचा वेग असणार आहे. तसेच मुंबईत शनिवारसारखेच रविवारीही ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मुंबईसह परिसरात काही ठिकाणी मध्यम मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल असेही शुभांगी भुते यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

मध्य महाराष्ट्रावरही परिणाम

वाऱ्याचा वेग काही ठिकाणी असणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्र सातारा, कोकण -सातारा सांगली कोल्हापूर, सोलापूर आणि पुण्याच्या घाट परिसरात वाऱ्याचा वेग वाढणारा असेल. मुंबई ठाणे परिसरातही वाऱ्याचा वेग असणार आहे. त्यामुळेच अनेक ठिकाणी झाडांची पडझड होऊ शकते. जेव्हा वादळ कोकणातून पुढे गुजरातकडे सरकेल तेव्हा मध्य महाराष्ट्र आणि मुंबई परिसरावर याचा परिणाम जाणवेल.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -