घरताज्या घडामोडी'फक्त अहंकारासाठी कांजूरचा आग्रह करण्यात आला होता'; फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

‘फक्त अहंकारासाठी कांजूरचा आग्रह करण्यात आला होता’; फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

Subscribe

राज्यात शिंदे गट आणि भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने सर्वप्रथम आरे कारशेडवरील स्थगिती उठवली. स्थगिती हटवल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. उद्धव ठाकरे यांनीही आमच्यावरील राग मुंबईवर काढू नका, अशी टीका त्यावेळी केली होती. याच मुद्द्यावर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.

मुंबई : राज्यात शिंदे गट आणि भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने सर्वप्रथम आरे कारशेडवरील स्थगिती उठवली. स्थगिती हटवल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. उद्धव ठाकरे यांनीही आमच्यावरील राग मुंबईवर काढू नका, अशी टीका त्यावेळी केली होती. याच मुद्द्यावर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. “फक्त अहंकारासाठी कांजूरचा आग्रह करण्यात आला होता. कांजूरमार्गची जागा एका डेपोसाठी आधीपासूनच मागितली गेली आहे. मात्र त्या जागेवरुन वाद सुरु असून, हायकोर्टात प्रकरण सुरु आहे”, अशी टीका फडणवीस यांनी केली. (dcm devendra fadnavis slams shiv sena chief uddhav thackeray on aarey carshed)

नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. “कांजूरमार्गची जागा एका डेपोसाठी आधीपासूनच मागितली गेली आहे. पण त्या जागेवरुन वाद सुरु आहेत. उच्च न्यायालयात त्या जागेचे प्रकरण सुरु आहे. कांजूरमार्गची जागा मेट्रो 6 साठी मागितली आहे. पण कांजूरमार्गची जागा मेट्रो ही 3 साठी योग्य नाही, असा अहवाल आमच्या काळातील कमिटीनेही केला होता”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

- Advertisement -

“मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी एसीएस सौनिक यांची उच्चस्तरीय समिती तयार केली होती. त्या समितीनेही कारशेडसाठी आरेमधील जागाच योग्य असल्याच स्पष्ट केले होते. ते कांजूरमार्गमध्ये नेलं तर प्रचंड खर्च वाढेल आणि चार वर्षांचा उशीर होईल असे समितीने सांगितले होते. मला वाटते की त्यांनी फक्त अंहकारासाठी कांजूरमार्गची मागणी केली. आम्हीदेखील वारंवार कांजूरची जागा रिकामी असती, तिचा वाद नसता तर खर्च करुनही कारशेड तिथे नेले असते. पण तिथे वाद सुरु आहे”, असेही फडणवीस यांनी म्हटले.

”मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये एकही झाड कापायची गरज नाही. कारशेडचे 29 टक्के आणि एकूण प्रकल्पाचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे”, असंही त्यांनी सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा – ‘त्या’ प्रकरणी शिवसेनेच्या 2 नेत्यांना पोलिसांकडून हद्दपारीची नोटीस

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -