घरताज्या घडामोडीआमचं समर्थन धनुष्यबाणासहित एकनाथ शिंदेंना, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

आमचं समर्थन धनुष्यबाणासहित एकनाथ शिंदेंना, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचं समर्थन धनुष्यबाणासहित एकनाथ शिंदेंना असल्याचं मोठं विधान केलं आहे. धुळ्यात लोकनेते मा. सरकारसाहेब रावल यांचा अमृत महोत्सव सोहळा पार पडला. या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवत शिंदे गटाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

तुम्ही शिंदे साहेबांकरीता धनुष्यबाण माझ्याकडे दिला. आता धनुष्यबाण नेमका कोणाचा याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग करेल. दोन्ही दावे पोहोचलेत. पण आमचं समर्थन धनुष्यबाणासहित एकनाथ शिंदेंना आहे. मला विश्वास आहे की, सर्वाधिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे तुम्ही दिलेला धनुष्यबाण मी त्यांच्या हातात देणार आहे. मला पूर्ण अपेक्षा आहे की, केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूनेच येईल. आयोग स्वायत्त असल्यामुळे मी फक्त बाजू भक्कम करू शकतो. पण निर्णय त्यांना घ्यायचा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

आज खरं तर माझं स्वागत हे गदा देऊन करण्यात आलंय. गदा आपण आधीच चालवली आहे. तशीच ती गदा चालवल्यामुळेच उठाव झालाय. आता आपल्याला गदा चालवण्याची आवश्यकता नाहीये. कारण आता हनुमान चालिसा म्हणण्यावर कोणत्याही प्रकारची बंदी नाहीये. ज्याला जेव्हा वाटेल, तेव्हा तो हनुमान चालिसा म्हणू शकतो. त्यामुळे हनुमानाची गदा आपल्याला पूजा करण्यासाठी ठेवायची आहे. कुणाच्याही डोक्यावर चालवण्याची आवश्यकता नाहीये. त्यावेळी मी सांगितलं होतं की, आम्ही गदादारी आहोत आणि समोरचे गदाधारी आहेत. कसे गदाधारी आहेत ते आपण बघितलं. परंतु त्यावर फार काही बोलण्याची आवश्यकता नाही, असं फडणवीस म्हणाले.

तुम्ही शिंदे साहेबांकरीता धनुष्यबाण माझ्याकडे दिला. आता धनुष्यबाण नेमका कोणाचा याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग करेल. दोन्ही दावे पोहोचलेत. पण आमचं समर्थन धनुष्यबाणासहित एकनाथ शिंदेंना आहे. मला विश्वास आहे की, सर्वाधिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे तुम्ही दिलेला धनुष्यबाण मी त्यांच्या हातात देणार आहे. मला पूर्ण अपेक्षा आहे की, केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूनेच येईल. आयोग स्वायत्त असल्यामुळे मी फक्त बाजू भक्कम करू शकतो. पण निर्णय त्यांना घ्यायचा आहे, असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

आज हे नवीन सरकार आलंय. लोकनेते सरकार रावल यांचा इतिहास जर आपण पाहिला. तर ते आपल्या मनातलं सरकार घेऊनच येतात. कारण २ ऑगस्ट १९४७ला त्यांचा जन्म झाला. तसेच आपल्या बारश्याला भारताचं सरकार घेऊन आले. आता आम्ही आझादी का अमृत महोत्सव साजरा करत होतो. सरकार रावल यांचा पायगुण चांगला असल्यामुळे मी येथे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून आलो. अतिशय उच्चविद्याविभूषित असलेले आणि एका मोठ्या घराण्यात जन्माला आल्यानंतर त्या घराण्याचा वारसा ज्याप्रमाणे नेतृत्वाचा आहे. तसाच तो वारसा कर्तृत्वाचा आहे. या घराण्याने मोठं तातृत्व देखील दाखवलं आहे. अनेक गोष्टी समाजासाठी आवश्यक असतात. त्या गोष्टी समाजाला देण्याचं काम त्यांनी केलंय.

स्वातंत्र्याच्या या महोत्सवाच्या निमित्ताने ७५ वर्ष देशाला पूर्ण झाले. अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ७५ फुटाचा तिरंगा झेंडा. कुणीही त्या फडफडणाऱ्या तिरंगा झेंड्याकडे पाहीलं की, असं मन त्या ठिकाणी भरून येतं. इतका अभिमान वाटतो. आपल्या देशाचा मानक असलेला तिरंगा हा डौलानं आपल्याला फडकताना दिसतो. त्यावेळी खऱ्या अर्थानं आपल्या देशाचा अभिमान आपल्याला वाटतो. तसेच आपला स्वाभिमान देखील जागृत होतो, असं फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : मराठी माणसाच्या कष्टामुळे मुंबई उभी, याचे श्रेय कोणाला घेता येणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -