घरमहाराष्ट्रमी नसलो तरी चालेल पण देशाची लोकशाही टिकली पाहिजे; उद्धव ठाकरेंचे आवाहन

मी नसलो तरी चालेल पण देशाची लोकशाही टिकली पाहिजे; उद्धव ठाकरेंचे आवाहन

Subscribe

या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. कॉंग्रेससोबत जाऊन आम्ही हिंदुत्व सोडलं तर ममता बॅनर्जीचा पाठिंबा घेतला तेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडलं होतं का?, काश्मीरमध्ये मुफ्तींसोबत जाऊन तुम्ही काय केलं, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला. अटलबिहारी वाजपेयींचं सरकार सेक्युलर चेहरा घेऊन सरकार चालवल होत याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करुन दिली. 

मुंबईः मी नसलो तरी चालेल पण देशाची लोकशाही टिकली पाहिजे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत बुधवारी केले. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक पार पडली.

या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. कॉंग्रेससोबत जाऊन आम्ही हिंदुत्व सोडलं तर ममता बॅनर्जीचा पाठिंबा घेतला तेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडलं होतं का?, काश्मीरमध्ये मुफ्तींसोबत जाऊन तुम्ही काय केलं, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला. अटलबिहारी वाजपेयी यांनी सेक्युलर चेहरा घेऊन सरकार चालवल होत याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करुन दिली.

- Advertisement -

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, फुटीचा शाप जो मराठ्यांना लागला. तो त्यांना लागला आहे. त्यामुळे मी नसलो तरी चालेल पण देशाची लोकशाही टिकली पाहिजे. आम्ही तर नागरिकांना भेटत असतो. पण कार्यकर्त्यांनाही गावपातळीवर सर्वांना भेटावं लागेल. तेथे महाविकास आघाडी एकत्र आली तर सर्व सुरळीत होईल.

जर लोकशाही टिकवायची असेल तर केवळ नेत्यांनीच नाही तर सर्वसामान्य माणसाने देखील पुढे येणं गरजेचं आहे. तुमचे नेते भाजपात जाणार हे आधी तुम्हाला कळलं नव्हतं का, असं मला नेहमी विचारलं जातं. माझे नेते भाजपात जाणार हे मला कळलं होतं. पण त्यांना कशासाठी थांबवायचं. जी विकली गेलेली माणसं आहेत त्यांची सोबत घेऊन लढाई कशी लढू शकतो मी? मला विकाऊ माणसं नको आहेत, ते शिवसैनिक म्हणून घेण्याच्या लायकीचे नाहीत. मला लढाऊ लोक हवेत. जेव्हा भाजपसोबत सरकार होतं तेव्हा भाजप अन्याय करतो हे सांगणारे एकनाथ शिंदेच होते.” असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

“एकतर भाजपात जा, नाही तर तुरूंगात अशीच सध्याची परिस्थिती झाली असून महाराष्ट्राला दिशा दाखवण्याची वेळ आपल्यावर आली आहे. वापरा आणि फेकून द्या अशी भाजपाची वृत्ती असून त्यांनी शिवसेनेचाही वापर करून घेतला.” असा आरोप यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -