‘त्यांना पुन्हा राजकारणात उठता येणार नाही…’, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

'आम्ही त्यांना पुन्हा राजकारणात उठता येणार नाही असे कोल्हापूरी भाषेत चितपट केले', अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. कोल्हापुरात आज केंद्रीय गृहमंत्री यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

‘आम्ही त्यांना पुन्हा राजकारणात उठता येणार नाही असे कोल्हापूरी भाषेत चितपट केले’, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. कोल्हापुरात आज केंद्रीय गृहमंत्री यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. (Devendra Fadanvis Uddhav Thackeray Kolhapur amit shah)

‘भाजपसोबत राहून युतीत आमची पंचवीस वर्षे सडली, असे विरोधक म्हणत होते. तेच विरोधक दोन्ही काँग्रेससोबत गेल्यावर त्यांचे अस्तित्व संपले आहे. आम्ही त्यांना पुन्हा राजकारणात उठता येणार नाही असे कोल्हापूरी भाषेत चितपट केले’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ‘कोल्हापूरात एकदा रणशिंग फुंकले की त्याचा वणवा महाराष्ट्रात पेटतो असा आमचा अनुभव आहे. म्हणूनच भाजप-शिवसेनेच्या विजयी मेळाव्याची सुरुवात कोल्हापूरातून केली जात आहे. गेल्या निवडणूकीत युतीच्या प्रचाराचा प्रारंभ ही आम्ही कोल्हापूरातून केला आणि राज्यात युतीला ४१ जागा मिळाल्या. तेच लक्ष्य घेवून आम्ही आगामी लोकसभेच्या निवडणुकीत उतरणार आहोत’, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“लोकसभेला चांगले यश मिळाले परंतू विधानसभेला जरा गडबडी झाल्या त्यामुळे पुरेसे यश मिळाले नाही. त्याची दुरुस्ती या निवडणुकीत करायची आहे. आमदारांनी खासदारांना निवडून आणायचे आहे आणि खासदारांनी आमदाराना विजयी करायचे आहे, हे ध्येय लक्षात घेवून मैदानात उतरायचे आहे. निकालानंतर पुन्हा विजयी मेळावा आम्ही याच कोल्हापूरात घेवू”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, अमित शाह यांनी येत्या २०२४ च्या निवडणुकांसाठी मोठी घोषणा केलीय. २०२४ च्या निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप एकत्र लढणार आहे, असं अमित शाह यांनी या सभेत जाहीर केलंय. तसंच बाकी उरले सुरले पक्ष एकत्र येऊन एकाच डब्ब्यात राहून भाजपविरोधात लढणार आहेत, असं देखील ते म्हणाले. यावेळी अमित शाह यांनी काही काळ मागे जाऊन लोकांना २०१४ पूर्वीच्या सरकारच्या काळाची आठवण करून दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापुरात दाखल झाले आहेत. कोल्हापुरात आल्यानंतर अमित शाहांनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीचं सपत्नीक दर्शन घेतलं. त्यानंतर कोल्हापुरात आयोजित केलेल्या भाजपच्या विजय संकल्प सभेत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी २०२४ च्या निवडणुकांमध्ये ४८ जागांवर शिवसेना-भाजपच्या विजयाचा संकल्प व्यक्त केलाय. सोबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा खरपूस समाचार घ्यायला मात्र विसरले नाहीत.


हेही वाचा – गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम शासन करणार, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही