कोश्यारींचा दावा योग्य, ठाकरेंच्या इगोमुळे पत्राचा फॉरमॅट..; देवेंद्र फडणवीसांची टीका

Devendra-Fadnavis

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत शिंदे गटाच्या बाजूने निर्णय घेतल्यानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मात्र, मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पदमुक्त झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण, १२ आमदारांची नियुक्ती आणि उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत त्यांनी मोठे खुलासे केले आहेत. दरम्यान, कोश्यारींचा दावा योग्य असून ठाकरेंच्या इगोमुळे पत्राचा फॉरमॅट बदलला नव्हता, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, राज्यपालांना अजित पवारांनी पत्र लिहिलं नव्हतं. तर उद्धव ठाकरेंनी लिहिलं होतं. मी भगतसिंग कोश्यारींची मुलाखत पाहिलेली नाही. मात्र, कोश्यारींनी जो दावा केलेला आहे, तो योग्य आहे. उद्धव ठाकरेंनी पत्राचा फॉरमॅट बदलला नव्हता. मला मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही पक्षाचे नेते राज्यपालांना भेटायला गेले होते. त्यानंतर अशा प्रकारे धमकीच्या पत्रावर राज्यपाल कधीच कारवाई करत नाही. त्यामुळे योग्य फॉरमॅटमध्ये पत्र पाठवा, असं राज्यपालांनी तिन्ही पक्षाच्या नेत्यांना सांगितलं होतं. मात्र, उद्धव ठाकरेंच्या इगोमुळे त्यांनी पत्राचा फॉरमॅट बदलला नव्हता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कोश्यारींची ठाकरेंवर टीका

उद्धव ठाकरे हे संत माणूस आहेत. ते कुठे राजकारणात आले? त्यांनी त्यांची संघटना व्यवस्थितपणे चालवायला हवी होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी बसण्याच्या लायकीची व्यक्ती नव्हती, तरीही त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं, अशी बोचरी टीका कोश्यारींनी ठाकरेंवर केली.

शरद पवारांसारखा मार्गदर्शकही उद्धव ठाकरेंना वाचवू शकला नाही. मी महाराष्ट्रात राज्यपाल असताना त्यांनी मला विमानातून उतरवलं होतं. आता नियतीने त्यांना खुर्चीवरून काली उतरवलं आहे. त्या खुर्चीवरूनच खाली खेचलं. मी त्यांना सत्तेतून खाली खेचलं नाही, पण नियतीने जे करायचं ते केलं, असं कोश्यारी यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी बसण्याच्या लायकीची व्यक्ती नव्हती तरीही…; भगतसिंग कोश्यारींचा घणाघात