घरमहाराष्ट्रठाकरे सरकारच्या कारभाराला कंटाळून डीजीपींनी प्रतिनियुक्ती स्वीकारली; फडणवीसांची टीका

ठाकरे सरकारच्या कारभाराला कंटाळून डीजीपींनी प्रतिनियुक्ती स्वीकारली; फडणवीसांची टीका

Subscribe

महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जयसवाल यांच्या बदलीवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारच्या कारभाराला कंटाळून सुबोध जयसवाल यांनी प्रतिनियुक्ती स्वीकारली असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची सीआयएसएफच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने तसे आदेश बुधवारी रात्री उशीरा काढले आहेत. सुबोध जयस्वाल यांनी राज्य सरकारकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरून मुक्त करण्याची विनंती केली होती. तसेच केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर जाण्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली होती.

“पोलीस हा स्वतंत्र विभाग आहे. तो जरी गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येत असला तरी एक स्वायत्ता आपण त्यासाठी दिली आहे. गृहमंत्र्यांचं, गृहमंत्रालयाचं आणि मुख्यमंत्र्यांचं पर्यवेक्षी असं काम आहे. परंतु सध्या छोट्यातल्या छोट्या अशा प्रत्येक ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारचा हस्तक्षेप चालला आहे. त्यामुळे अशाप्रकारचा निर्णय डीजींनी घेतला. मला वाटतं पहिल्यांदा अशाप्रकारे अशी परिस्थिती आली आहे की, सरकारच्या कारभाराला कंटाळून डीजी प्रतिनियुक्तीवर चालले आहेत. मला वाटतं हे महाराष्ट्रासाठी भूषणावह गोष्टी नाही आहे, ” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, सुबोध जयसवाल यांनी राज्य सरकारकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरून मुक्त करण्याची विनंती केली होती. तसंच केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर जाण्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली होती. पोलीस दलाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेताना राज्य सरकार विचारात घेत नसल्यानं सुबोध जयसवाल नाराज होते. राज्यात ठाकरे सरकार आल्यानंतर जयसवाल यांचे सरकारशी फारसे सलोख्याचे संबंध राहिले नाहीत. बदल्या, नियुक्त्या, पुनर्नियुक्त्या आणि इतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेताना आपल्याला डावलले जात असल्याची भावना जयसवाल यांनी खासगीत बोलून दाखवली होती. याबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतरही परिस्थितीत बदल न झाल्याने त्यांनी महाराष्ट्र सोडून पुन्हा केंद्रात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. याबाबत त्यांनी जवळपास दोन महिन्यांपूर्वीच राज्यातील प्रमुखांकडे पत्रव्यवहार केला होता.

आता ज्येष्ठतेनुसार वरिष्ठ आयपीएस अधिकारी होम गार्डचे महासंचालक संजय पांडे आणि त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यापैकी एकाची महासंचालक पदावर वर्णी लागू शकते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -