घरमहाराष्ट्रइंजेक्शनचा तो साठा सरकारला देण्यास फडणवीसांनी मदत करायला हवी होती - बाळासाहेब...

इंजेक्शनचा तो साठा सरकारला देण्यास फडणवीसांनी मदत करायला हवी होती – बाळासाहेब थोरात

Subscribe

रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. रेमडेसिवीर वितरित करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पोलीस स्टेशन गाठलं. यावरुन महाविकास आघाडीमधील नेते टीका करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी तो साठा सरकारला मिळावा म्हणून मदत करायला हवी होती, अशी टीका महसूल मंत्री बाळासहेब थोरात यांनी केली आहे. ज्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना गुजरातमध्ये काळाबाजार केल्याप्रकरणी अटक होते, त्या कंपनीच्या अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी पोलीस स्टेशन गाठतात. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, असं थोरात म्हणाले.

“देवेंद्र फडणवीस हे अत्यंत समजदार असे विरोधी पक्षनेते आहेत. रेमडेसिवीरचा तो साठा सरकारकडे सुपुर्द करण्यासाठी मदत करायला हवी होती. भाजपचा कार्यकर्ता म्हणून त्याला पाठीशी घालणं योग्य नव्हतं. ज्या कंपनीच्या अधिकाऱ्याची बाजू घेतली ती कंपनी गुजरातमध्ये काळाबाजार करताना पकडली गेलीय. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती,” असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला मदत पर्यायाने जनतेला मदत करण्याकरता पुढे यायला हवं. दिल्लीला जाऊन बसले तर ऑक्सिजनचा पुरवठा करतील, दु्र्दैवाने ते पोलीस स्टेशनला जाऊन बसतात, असा टोला देखील थोरात यांनी लगावला. यावेळी त्यांनी औषधआचा साठा महाराष्ट्राला देऊच नये असा जो आदेश काढला जातो अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं.

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी महाराष्ट्राला ऑक्सिजनचा वापर कमी करा असा सल्ला दिला आहे. यावर बोलताना त्यांनी गोयल यांना प्रतिप्रश्न केला आहे. तर विशाखापट्टणमवरुन ऑक्सिजन येणार ही चांगली बातमी असल्याचं थोरात म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -