घरमहाराष्ट्रसांगलीमध्ये आरक्षणाच्या मागणीवरुन धनगर समाज रस्त्यावर

सांगलीमध्ये आरक्षणाच्या मागणीवरुन धनगर समाज रस्त्यावर

Subscribe

मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर आता धनगर समाज देखील आरक्षणाच्या मागणीवरुन रस्त्यावर उतरला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाने बंद, रास्तारोको, धरणे आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

आरक्षणाच्या मागणीवरुन आधीच मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. आता त्या पाठोपाठ आरक्षणाच्या मागणीवरुन धनगर समाज देखील रस्त्यावर उतरला आहे. आज राज्यभरामध्ये आरक्षणाच्या मागणीवरुन धनगर समाज रस्त्यावरु उतरुन गाव बंद, रास्तारोको, धरणे आंदोलन करत आहे. अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावी अशी धनगर समाजाची मागणी आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन

आज अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी आहे. याचे औचित्य साधून आज धनगर समाज राज्यभरामध्ये आंदोलन करत आहे. सांगलीमध्ये धनगर समाज महासंघाच्यावतीने आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील धनगर समाजाचे नेते आणि धनगर बांधव मोठया संख्येने सहभागी झाले आहेत. आरक्षणाच्या मागणीवर ठाम असून यापेक्षा तिव्र आंदोलन करण्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

सांगलीमध्ये वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलन सुरु

सांगलीमध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गावामध्ये बंद पाळण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रास्तारोको, गाव बंद, धरणे आंदोलन, निषेध रॅली काढण्यात आली. तर आष्टा येथे शेळ्या-मेंढ्यांना रस्त्यावर उतरवून रास्तारोको करण्यात आला. या आंदोलना दरम्यान कोणताही अनुच्चित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर आटपाडी आगारामधून एसटी सेवा बंद करण्यात आली आहे.

गरज पडल्यास महाराष्ट्र बंदची हाक देऊ

गेल्या चार वर्षांपासून राज्य सरकारकडून धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या केवळ आश्वासन देऊन फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप डांगे यांनी केला आहे. तसेच आता धनगर समाजाचा संयम सुटत चालला आहे.आणि आज पासून धनगर समाजाचे आंदोलन हे टप्प्याटप्प्याने तीव्र करण्यात येईल तर आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन तीव्र होत राहील आणि प्रसंगी महाराष्ट्र बंद करण्यात येईल असा इशारा माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांनी सरकारला दिला आहे.

- Advertisement -

Dhangar community aggressive over reservation demand

मराठ्यानंतर आता धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावरआरक्षणाच्या मागणीवरुन आता मराठा समाजाच्या पाठोपाठ धनगर समाज देखील रस्त्यावर उतरला आहे. राज्यभरामध्ये आज रास्तारोको, गाव बंद, धरणे आंदोलन करण्यात येत आहे. अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावी अशी धनगर समाजाची मागणी आहे. दरम्यान आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन तीव्र होत राहील आणि प्रसंगी महाराष्ट्र बंद करण्यात येईल असा इशारा माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांनी सांगलीमध्ये दिला आहे.

Posted by My Mahanagar on Monday, August 13, 2018

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -