Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र उस्मानाबादचे मनसे जिल्हाध्यक्ष भारत राष्ट्र समिती पक्षात; कार्यकर्त्यांसह केला प्रवेश

उस्मानाबादचे मनसे जिल्हाध्यक्ष भारत राष्ट्र समिती पक्षात; कार्यकर्त्यांसह केला प्रवेश

Subscribe

 

उस्मानाबादः महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे (मनसे) उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला आहे. कार्यकर्त्यांसह नवगिरे यांनी चंद्रशेखरराव यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केल्याने धाराशिवमध्ये हा मनसेला मोठा धक्का मानला जात आहे.

- Advertisement -

गेली २७ वर्षे नवगिरे हे राज ठाकरे यांंच्या सोबत होते. नवगिरे यांच्याकडे मनसेने मोठी जबाबदारीही दिली होती. ते काही काळ महाराष्ट्र नवनिर्माण एसटी कामगार सेनेचे उपाध्यक्षही होते. त्यानंतर त्यांची जिल्हाध्यक्ष पदी वर्णा लागली. नवगिरे यांनी पक्ष सोडल्याने मनसेमध्ये मोकळी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखरराव यांच्या महाराष्ट्रात सध्या सभा सुरु आहेत. शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून चंद्रशेखरराव प्रचार करत आहेत. त्यांच्या पक्षात अनेक जण प्रवेश करत आहेत. चंद्रशेखरराव यांची पहिली सभा नांदेडमध्ये झाली. BRS पक्षाचे राष्ट्रीय पक्ष म्हणून विस्तारीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री केसीआर यांनी कंबर कसली आहे. या अगोदर कर्नाटक राज्यात बैठका आणि सभांचे सत्र सुरू केले. त्यानंतर BRS पार्टी महाराष्ट्रात आपल्या पक्षाची वाटचाल सुरू करण्यासाठी पहिली जाहीर सभा नांदेडमध्ये घेतली. तेलंगणा (Telangana) राज्याचे मुख्यमंत्री KCR अर्थात कुलवकुंथाला चंद्रशेखर राव यांच्या TRS (तेलंगणा राष्ट्र समिती) या पक्षाचे नाव बदलून त्यांनी (BRS) भारत राष्ट्र समिती हे नाव केले आहे.

- Advertisement -

भाजपविरोधात एकत्र येणाऱ्या पक्षांमध्ये चंद्रशेखरराव हेही आघाडीवर होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना चंद्रशेखरराव यांनी त्यांचीही भेट घेतली होती. महाराष्ट्रात पायेमुळे रोवण्यासाठी ते सध्या महाराष्ट्रात सभा घेत आहेत. त्यांच्या सभेला प्रतिसादही मिळत आहे. बहुजन समाजासाठी तेलंगणामध्ये सुरु करण्यात आलेल्या योजना. तेथील सोयीसुविधा याची माहिती चंद्रशेखरराव हे सभांमधून देत आहेत. त्यांच्या संघर्षमयी वाटचालीची भुरळ पडून अनेकजण चंद्रशेखरराव यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना याचा फायदा होऊ शकतो की नाही याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

- Advertisment -