घरताज्या घडामोडीविरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर, गृहमंत्र्यांचा भाजपवर हल्लाबोल

विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर, गृहमंत्र्यांचा भाजपवर हल्लाबोल

Subscribe

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांच्या आधारे कारवाई करण्यात येत आहे. नेत्यांवर आरोप करुन राज्य सरकराची बदनामी करण्याचे भाजपचे षडयंत्र असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. भाजपकडून विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे. यापुर्वी असे कधी झाले नाही असेही गृहमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं आहे.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील नियोजित कार्यक्रमासाठी नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नागपूरमधूनच गृहंमंत्री वळसे पाटील यांनी केंद्रावर हल्लाबोल केला आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांवर केंद्रीय यंत्रणाद्वारे कारवाई करण्यात येत आहे. याबाबत वळसे पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटलं आहे की, भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा वापर विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी होत आहे. असं कधी होत नव्हते अशी टीका गृहमंत्र्यांनी केली आहे.

- Advertisement -

मलिकांची एनसीबीसंदर्भात तक्रार असावी

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे बोगस कारवाई करत असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. याबाबत गृहमंत्र्यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, नवाब मलिकांची एनसीबीविरोधात तक्रार असावी यामुळेच त्यांनी एनसीबीच्या समीर वानखेडेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहेत.

परमबीर सिंह विरोधात पुढची कारवाई करु

मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधातील अहवाल अद्याप राज्य सरकारला प्राप्त झाला नाही. जेव्हा तो अहवाल राज्य सरकारला प्राप्त होईल त्यावेळी परमबीर सिंह यांच्याविरोधात पुढील कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : जरंडेश्वरचा मालक कोण?, सोमय्यांच्या प्रश्नाला अजित पवारांनी दिलं उत्तर


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -