घरक्राइममुंबई विमानतळावर डीआरआयकडून 80 कोटींचे ड्रग्ज जप्त

मुंबई विमानतळावर डीआरआयकडून 80 कोटींचे ड्रग्ज जप्त

Subscribe

मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळावर मागील अनेक दिवसांपासून आमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच पुन्हा एकदा महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) विमानतळावर अमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई केली आहे.

मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळावर मागील अनेक दिवसांपासून आमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच पुन्हा एकदा महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) विमानतळावर अमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई केली आहे. डीआरआयने तब्बल 80 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे आणि केरळमधील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. (Directorate Of Revenue Intelligence Mumbai Seizing 16 Kg Of High Quality Heroin Worth Over Rs 80 Crores at airport)

मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्ज लपवण्यासाठी बॅगेत एक खास व्यवस्था केली होती. बॅगेच्या पोकळीत ड्रग्ज लपवले होते. पोलिसांनी हे ड्रग्ज शोधून काढले व त्याचे वजन केले असता ते तब्बल 16 किलो आढळले. एवढच नाहीतर याची किंमतही कोट्यवधींमध्ये असल्याचे समोर आले आहे. यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटक केली असून, ड्रग्ज ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

- Advertisement -

या ड्रग्ससह डीआरआय मुंबईने मंगळवारी रात्री साडेतीन किलो वजनाचा एक अमली पदार्थ केकही जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतची माहिती डीआरआयला अमेरिकेतील एका कुरिअर कंपनीकडून मिळाली होती. एका खाद्यान्नाच्या खोक्यात हा माल लपविण्यात आला होता. हा माल मुंबईतील परदेशी टपाल कार्यालयात लपविण्यात आला होता. तेथून तो हैदराबादला जाणार होता. त्याआधी दिल्लीत बदलला जाणार होता.

याबाबतची माहिती मिळताच डीआरआयने अधिक तपास करत दोघांना अटक केली. त्यापैकी एक जण हैदराबाद येथील असून तोच खरा या तस्करीचा म्होरक्या आहे. त्याने या तस्करीची परदेशात मागणी करण्यासाठी ‘डार्क वेब’ यंत्रणेचा वापर केला. तर पैशांचा व्यवहार क्रिप्टो चलनात केला होता.

- Advertisement -

डीआरआयने आणखी माहिती काढली असता अशी एकूण ५.३० किलोची तस्करी करण्यात आली होती व त्याचे बाजारी मूल्य २.३६ कोटी रुपये होते. ही सर्व गांजाच्या केकची तस्करी असल्याचे समजते.


हेही वाचा – पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनावेळी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे 7 जणांचा मृत्यू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -