घरमहाराष्ट्रआता होणार 'देशी गाईं'चे वाटप

आता होणार ‘देशी गाईं’चे वाटप

Subscribe

राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी आता दुधाळ संकरीत गाई, म्हशींच्या गट वाटप योजनेमध्ये 'देशी गाईं'च्या वाटपाचा देखील समावेश करण्यात येणार आहे.

राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दुधाळ संकरीत गाई, म्हशींच्या गट वाटप योजनेमध्ये ‘देशी गाईं’च्या वाटपाचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतचा शासनाने निर्णय नुकताच जारी केला आहे. राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपयोजनेंतर्गत दुधाळ पशुंच्या गट वाटपाची योजना राबविण्यात येत आहे. २०१५ पासून याबाबतच्या जुन्या योजनांऐवजी सहा, चार किंवा दोन दुधाळ गाई किंवा म्हशींचे गट वाटप करण्याची नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येते.

या गाईंचा योजनेत होणार समावेश

देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी आता या योजनेत देशी गाईंच्या गट वाटपाचा समावेश करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. गीर, सहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर, देवणी, लाल कंधारी, गवळाऊ आणि डांगी गाई या योजनेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. प्रतिदिन १० ते १२ लिटर दूध उत्पादन क्षमतेच्या एचएफ, जर्सी गाई; प्रतिदिन ८ ते १० लिटर दूध उत्पादन क्षमतेच्या गीर, सहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर या देशी गाई; प्रतिदिन ५ ते ७ लिटर दुग्धोत्पादन क्षमतेच्या देवणी, लाल कंधारी, गवळाऊ आणि डांगी या गाईंचे गट वाटप करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

प्रतिदिन ८ ते १० लिटर दूध उत्पादन क्षमतेच्या सुधारित मुऱ्हा आणि जाफराबादी म्हशींचे वाटप करण्यात येते. वाटप करण्यात येणाऱ्या गाई आणि म्हशी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेतातील असाव्यात. तसेच दुधाळ गाई आणि म्हशी शक्यतो १ ते २ महिन्यापूर्वी व्यायलेल्या असाव्यात, असे निकषही शासन निर्णयानुसार स्पष्ट करण्यात आले आहेत.


वाचा – मोकाट गाईंचा बालकावर जीवघेणा हल्ला, सत्तरवर्षीय वृद्धा थोडक्यात बचावली

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -