घरCORONA UPDATEकरोनाचे गांभीर्य गावकऱ्यांना समजले, लढवली ही अनोखी शक्कल

करोनाचे गांभीर्य गावकऱ्यांना समजले, लढवली ही अनोखी शक्कल

Subscribe

संगमनेरनमधील झाेळे गावात अत्यावश्यक सेवेत अन्नधान्याचा समावेश असल्याने रेशन दुकानातून धान्य वितरण करण्यासाठी तालुक्यातील एका रेशन दुकानदाराने अनोखी शक्कल लढवली आहे.

– अनंत पांगारकर 

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊननंतर नागरिकांनी घरात थांबण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार होत असताना आवश्यक कामासाठीच नागरिकांना घराबाहेर पडता येणार आहे. अत्यावश्यक सेवेत अन्नधान्याचा समावेश असल्याने रेशन दुकानातून धान्य वितरण करण्यासाठी तालुक्यातील एका रेशन दुकानदाराने अनोखी शक्कल लढवली आहे. सोशल डिस्टन्सिंगसाठी या दुकानदाराने वजन केलेला माल एका पाईपमधून ग्राहकाला देण्यास सुरुवात केली, याची तालुक्यात चर्चा सुरु आहे.

- Advertisement -

अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडल्यानंतर जवळजवळ उभे राहू नये, दोन व्यक्तीत पुरेसे अंतर राखले जावे, एकमेकांचा संसर्ग टाळावा, असे सांगितले जात असताना हा संसर्ग टाळण्यासाठी संगमनेर तालुक्यातील झोळे गावच्या धान्य दुकानदाराने एक अनोखा जुगाड केला आहे. दुकानदाराने धान्य देण्यासाठी एक भला मोठा पाईप दुकानातून बाहेर काढला. तराजूत धान्याचे वजन केल्यानंतर तराजुजवळ लावलेल्या पाईपमधून हे धान्य वितरीत केले. पाईपचे एक टोक तराजुजवळ तर दुसरे टोक दुकानाबाहेर काही अंतरावर ठेवले. त्यामुळे दुरूनच नागरिकांना हे धान्य घ्यावे लागत आहे.

एकीकडे सरकारचे आवाहन न जुमानता आणि समोर आलेल्या संकटाचे गांभीर्य नसलेले लोक संचारबंदीतदेखील अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली शहरातील रस्त्यावर येत आहे. बंदोबस्तावरील पोलिसांना काहीतरी कारणे सांगत शहरातील रस्त्यावर भटकत असताना दुसरीकडे मात्र संगमनेरच्या ग्रामीण भागात करोनाचा धोका ग्रामस्थांना समजला असेच म्हणावे लागेल. ग्रामीण भागातील लोकांना या साथरोगाचे महत्त्व पटत असताना हुश्शार समजले जाणारे शहरी लोक असे विचित्र का वागत आहेत, असा प्रश्न उपस्थित होतो.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: तंबाखूचे सेवन-धुम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा जास्त धोका – WHO

संगमनेरनजीक पाच-सहा किलोमीटर अंतरावर असलेले झाेळे हे सुमारे ३००० लोकसंख्येचे गाव. गावात ४५६ शिधापत्रिकाधारक आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशावरुन संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसिलदार अमोल निकम यांच्यासह सर्वच यंत्रणा करोनापासून संगमनेरकरांचा बचाव करण्यासाठी दिवसरात्र काम करत असताना त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत झाेळे येथील धान्य दुकानदाराने केलेल्या या अनोख्या प्रयाेगाची चर्चा सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -