घरमहाराष्ट्रपुण्यात शेवटी डॉल्बी वाजलाच!

पुण्यात शेवटी डॉल्बी वाजलाच!

Subscribe

मुंबई हायकोर्टाने डॉल्बी आणि डीजेवर बंदी घातली असताना देखील पुण्यातील टीळकरोडवर गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये शेवटी डॉल्बी वाजलाच!

गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे आणि डॉल्बीवर मुंबई हायकोर्टाने बंदी घातली आहे. मात्र असे असताना देखील राज्यातील सांस्कृतिक शहर म्हणून मानल्या जाणाऱ्या पुणे शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट सुरू झालेला पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे आणि डॉल्बीच्या बंदीचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. पुण्यामधील टिळकनगर रोड आणि लक्ष्मीनगर या ठिकाणी डीजेचे रेक एकामागे एक उभे करत डॉल्बीच्या दणदणाटाला सुरूवात झाली आहे. डीजे आणि डॉल्बीमुंळे होणाऱ्या त्रासाला लक्षात घेता हायकोर्टाने डीजे आणि डॉल्बी वाजवण्याची परवानगी नाकारत बंदी कायम ठेवली होती. मात्र कोर्टाच्या या बंदीला विरोध करत पुण्यात शेवटी डॉल्बी वाजलाच!

या मार्गांवरुन निघतात मिरवणुका

पुण्यातील टिळकनगर आणि लक्ष्मीनगर या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि घरगुती गणपती बाप्पांच्या मिरवणुका काढल्या जातात. या मार्गावरुन गुलालाची उधळण करत बाप्पाच्या मिरवणुका मार्गस्थ होतात. मात्र यंदा डीजे आणि डॉल्बीला परवानगी असताना देखील नियमाचे उल्लंघन करुन डीजे वाजवण्यात आला आहे.

- Advertisement -

विसर्जनाकरता डीजे रेकची रांग

गणेश विसर्जना दरम्यान डीजे, डॉल्बीवर बंदी घातली होती. या निर्णयाला साताऱ्याचे खासदार उद्यन राजे भोसले यांनी देखील विरोध केला होता. मात्र आता त्या पाठोपाठ पुण्यामध्ये काही मंडळांनी डीजे बंदी विरोध केल्याचे पाहायला मिळत आहे. आता टिळकनगर आणि लक्ष्मीनगर जाणाऱ्या बऱ्याच मंडळांने डीजेच्या दणदणाटाला सुरुवात केली आहे.

मुंबई गणेश विसर्जन मिरवणूक LIVE : अजानसाठी थांबला ‘लालबागचा राजा’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -