घरमहाराष्ट्रनागपूरसरकारच्या भरवशावर राहू नका, नितीन गडकरींचा शेतकऱ्यांना सल्ला

सरकारच्या भरवशावर राहू नका, नितीन गडकरींचा शेतकऱ्यांना सल्ला

Subscribe

मुंबई – नितीन गडकरींना भाजपाने साईड लाईन केल्यापासून गडकरी दिलखुलास लोकांशी बोलत आहेत. सरकारवर ताशेरे ओढत आहेत. आता त्यांनी शेतकऱ्यांसह संपूर्ण देशाला एक महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे. मी सरकारमध्ये असूनही सांगतोय, की सरकारच्या भरोशावर राहू नका, त्यांच्या यावाक्यामुळे भाजपाला घरचा आहेर मिळाला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीत आणि निवडणूक समितीतून बाहेर ठेवण्यात आले आहे. यामुळे नितीन गडकरींबाबत भाजपामध्ये असलेलील अंतर्गत धुसफूस सिद्ध झालीय. आपल्या स्पष्ट वक्तेपणामुळे नितीन गडकरी ओळखले जातात. त्यामुळे त्यांचे पक्षातच अनेक शत्रूही आहेत, असं राजकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय. दरम्यान, त्यांनी नुकतंच केलेलं एक विधान अत्यंत महत्त्वाचं आहे. ते नागपुरातील अॅग्रो व्हिजन फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलत होते.

- Advertisement -

शेतकऱ्यांनी सरकारवर फारसं अवलंबून राहू नये, मी स्वतः सरकारमध्ये आहे, म्हणून तुम्हाला सांगतोय. कृषी क्षेत्रात विकास करायचा असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे. सरकारच्या भरवश्यावर न राहता स्वतः कृती करायला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी प्रगती केली आहे, अशा शेतकऱ्यांचा आदर्श घ्या, असं नितीन गडकरी म्हणाले.
तसंच, माझं मार्केट मी शोधलं आहे, तुमचं मार्केट तुम्ही शोधा, असा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिलंय.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -