पदवीधर निवडणुक : मुंबई विद्यापीठाच्या 30 जानेवारी रोजी होणाऱ्या ‘या’ परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 30 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या एकूण 30 परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांचे 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे.

Mumbai University receives bomb blast threat mail from unknown person

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 30 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या एकूण 30 परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांचे 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. या मतदानामुळे मुंबई विद्यापीठाने नियोजित केलेल्या परीक्षा आता 7 फेब्रुवारी 2023 रोजी होणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. (due to election mumbai university exams scheduled for january 30 have been postponed)

विविध अभ्यासक्रमाच्या एकूण 30 परीक्षा मुंबई विद्यापीठाकडून 30 जानेवारी 2023 रोजी घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. विधि (Law), अभियांत्रिकी (Engineering), विज्ञान शाखेचे (M.Sc) चौथे सत्र, वाणिज्य (Commerce) आणि अन्य संबंधित अभ्यासक्रमांचा समावेश होता.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीमुळे मानवता विषयाच्या पदव्युत्तर पदवी (MA- Sem II, Sem IV) सत्र तिसरे आणि चौथे, विधि अभ्यासक्रमाचे (Law : LLM : Sem III, BBA -LLB Sem III) सत्र तिसरे, अभियांत्रिकी (Engineering : SE Sem III) अभ्यासक्रमाचे सत्र तिसरे, विज्ञान शाखेच्या (Science : M.Sc Sem IV, M.Sc Part II) एमएससी सत्र चौथे, एम एससी भाग दोन, वाणिज्य (Commerce: M.Com Part II) शाखेच्या, एमकॉम भाग दोन या परीक्षा 30 जानेवारी रोजी नियोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, आता त्या 7 फेब्रुवारी 2023 पासून घेण्यात येणार आहेत असे विद्यापीठाने जाहीर केले आहे.

30 परीक्षा पुढे ढकलल्या

  • Humanities : MA Sem III, MA Sem II, Sem IV
  • Law : LLM : Sem III, BBA -LLB Sem III
  • Engineering : SE Sem III
  • Science : M.Sc Sem IV, M.Sc Part II.
  • Commerce: M.Com Part II

हेही वाचा – बाळासाहेबांनी ठरवलं असतं तर मुख्यमंत्री झाले असते…; उपमुख्यमंत्री फडणवीस