Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र उन्हाच्या तडाख्याने भाज्यांची आवक घटली

उन्हाच्या तडाख्याने भाज्यांची आवक घटली

Subscribe

 दर वाढू लागले, हॉटेलांतील शाकाहार महागला

होलिकोत्सवानंतर होणार्‍या तापमानातील वाढीमुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. उन्हामुळे भाजीपाल्याची आवक घटण्यास सुरूवात झाली, तसेच भाज्यांचे दरही वाढू लागले आहेत. रायगड जिल्ह्याच्या आठवडा बाजारातही भाज्यांचे भाव वाढू लागले आहेत. स्थानिक भाज्यांचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे. त्यातच वाशी व पुणे येथून येणार्‍या भाज्यांच्या दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात कमालीची वाढ होऊ लागली आहे.

भाज्या महागल्यामुळे हॉटेल व खानावळीतही शाकाहार महागला आहे. त्यामुळे व्यावसायिक शाकाहार देणे परवडत नसल्याचे सांगत आहेत. काही दिवसांपासून वातावरणातील उष्णता वाढली आहे. या आधी जिल्ह्याबरोबरच राज्यातही बर्‍याच ठिकाणी पाणी आटल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या उत्पादनावर होण्यास सुरूवात झाली होती. उन्हाचा पारा वाढत असल्याने उष्णता निर्माण करणार्‍या शेवग्याच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात भाव खाणारा शेवगा किमतीत मागे पडू लागला आहे.

- Advertisement -

उन्हाळा जसा जसा वाढेल व ग्रामीण भागात पाणीटंचाई तीव्र रूप धारण करेल तेव्हा स्थानिक भाजी बाजारात येणे जवळपास बंद होते. याचा परिणाम नंतर भाज्यांच्या दरावर होऊन पुढील महिन्यात पालेभाज्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे कुरुळ कॉलनी येथील भाजी विक्रेत्या चोरघे यांनी सांगितले.

भाज्यांचे सध्याचे दर (रुपये प्रती किलो)
भेंडी- 80
गवार- 80
वांगी- 60
मटार- 80 ते 90
पावटा- 80
सिमला- 80
टोमॅटो- 30

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -