छत्रपती संभाजीनगरमध्ये ९ ठिकाणी ईडीची छापेमारी; १९ जणांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगरमध्ये ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीने शहरामध्ये ९ आज सकाळपासूनच कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. ज्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या छापेमारीमध्ये पोलिसांनी आतापर्यंत एकूण १९ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

ED raids at 9 places in Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर : प्रधानमंत्री आवास योजनेसाठी काढण्यात आलेल्या निविदांमध्ये घोटाळा झाल्याच्या संशयावरून ईडीकडून छत्रपती संभाजीनगर येथे ९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. शहरामध्ये ईडीकडून करण्यात आलेली ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी छापेमारी असल्याचे बोलले जात आहे. ईडीकडून ९ वेगवेगळ्या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. आज (ता. १७ मार्च) सकाळी ईडीने तीन ठिकाणी छारेमारी केली, ज्यामुळे शहरात खळबळ उडाली होती. दरम्यान, ईडीने आता या प्रकरणांमध्ये १९ जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. मागील आठवड्यात ११ मार्चला रतनलाल बाफना नामक सराफा दुकानावर जीएसटी विभागाने छापा टाकला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती सभाजीनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या ४० हजार घरांसाठी तब्बल ४ हजार कोटी रुपयांचे कॉन्ट्रक्ट देण्याबाबतच्या या निविदा काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी रमरथ कन्ट्रक्शन,ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस आणि जग्वार ग्लोबल सर्विसेस या कंपन्यांनी यासाठी निविदा सादर केली होती. पण या सर्व निविदा एकाच आयपीवरुन भरल्या असल्याचे उघड झाल्यानंतर याबाबतची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच एकाच आयपीवरुन निविदा भरल्या गेल्याने यामध्ये अटींचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजनांमध्ये फसवणूक झाल्याच्या प्रकरणी ईडीने आज सकाळी छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक अमर बाफना यांच्या बगीचा इमारतीमधील घरावर ४ ते ५ अधिकाऱ्यांनी दाखल होत छापेमारी करण्यास सुरूवात केल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, कॅनॉट प्लेस येथील रुग्णालय, गारखेडा परिसर आणि आकाशवाणीचा परिसर अशा ९ ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये एक डॉक्टर आणि बिल्डरचा सुद्धा समावेश असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा – राहुल गांधी देशविरोधी टुलकिटचा भाग, नड्डांची जहरी टीका; म्हणाले, परदेशात भारताचा अपमान…

याआधी मागील आठवड्यात सुद्धा जीएसटी विभागाने रतनलाल बाफना नामक सराफा दुकानावर छापा टाकला होता. शुक्रवारी आणि शनिवारी असे दोन दिवस ही कारवाई करण्यात आली होती तसेच, त्यावेळी जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दुकानातील कर्मचाऱ्यांची सुद्धा कसून चौकशी केली होती.