ईडीची कारवाई सुरुच, अनिल देशमुखांच्या २ घरांवर पुन्हा एकदा ईडीचा छापा

ईडीने अनिल देशमुख यांच्या काटोल आणि वडविहिराच्या घरी छापेमारी केली

Anil Deshmukh Sent To ED Custody Till Nov 12 By Bombay HC; Sessions Court Order Set Aside
अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, हायकोर्टाने १२ नोव्हेंबरपर्यंत सुनावली ईडी कोठडी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. रविवारी सकाळीच अनिल देशमुख यांच्या दोन घरांवर ईडीने छापेमारी केली आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ईडीने धडक कारवाई सुरु केली आहे. ईडीने काही दिवसांपुर्वी अनिल देशमुख यांची ४ कोटींहून अधिक संपत्ती जप्त केली होती. त्यानंतर आता ईडीने अनिल देशमुख यांच्या काटोल आणि वडविहिराच्या घरी छापेमारी केली आहे. दिवसेंदिवस अनिल देशमुख यांचा पाय खोलात जाताना दिसत असल्यामुळे ई़डीकडून अनिल देशमुख यांना लवकरच समन्स जारी करण्यात येण्याची शक्यता आहे.

ईडीने पुन्हा एकदा अनिल देशमुख यांच्याविरोधात कारवाई सुरु केली आहे. अनिल देशमुख यांचे निवासस्थान काटोल आणि वडविहीराच्या घरी छापेमारी केली आहे. या छापेमारीत ईडीच्या हाती काय लागतंय हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. नागपुर जिल्ह्यातील काटोल नटखट तालुक्यातील देशमुखांच्या मुळगावी ही छापेमारी करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांच्यावर मनी लॉंन्ड्रिग चा आरोप करण्यात आला आहे. यापुव्ही ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते परंतु तब्येतीचे कारण देत चौकशीस हजर राहणे टाळले आहे.

अनिल देशमुखांची ४ कोटी २० लाख रुपयांची संपत्ती जप्त

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संपत्तीवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. एकूण ४ कोटी २० लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्य मुंबई वरळीमधील सुखदा या इमारतीमधील पत्नीच्या नावे असलेला एक फ्लॅट सील केला असून या फ्लॅटची एकूण किंमत १ कोटी ५४ लाख रुपये आहे. तसेच उरण येथील २ कोटी ६७ लाख रुपये किंमतीची जमीन जप्त केली आहे. तसेच नागपूर येथे असलेली मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. ईडीने मनी लॉंड्रिंग प्रकरणात ही कारवाई केली असल्याचे सांगितले जात आहे.

अनिल देशमुख जेलमध्ये जाणार

माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी ट्विट करत एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यामध्ये सोमैय्या यांनी म्हटलं आहे की, अनिल देशमुख यांनी १०० कोटींचा मनी लॉन्ड्रिंग केलं आहे. नागपूर, मुंबई,उरण, जेएनपीटी येथे जमीन घेणे आपला पैसा चॅरिटेबल ट्रस्ट, एज्युकेशन ट्रस्ट, कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणे याचा हिशोब आता ईडी मागत आहे. अनिल देशमुख यांना ईडीच्या चौकशीसाठी समोर यावं लागणार आहे. १०० कोटीचा आर्थिक घोटाळा आणि अवैध संपत्तीमुळे जेलमध्ये जावं लागणार असा दावा भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी केला आहे.


हेही वाचा : अनिल देशमुख प्रकरण: तर त्या बारमालकांना अटक का नाही? काँग्रेसचे ईडीला चार सवाल