घरताज्या घडामोडीमुंबई, नागपूरसह राज्यातील अनेक भागांत ईडीची पुन्हा छापेमारी; कोट्यवधीची मालमत्ता जप्त

मुंबई, नागपूरसह राज्यातील अनेक भागांत ईडीची पुन्हा छापेमारी; कोट्यवधीची मालमत्ता जप्त

Subscribe

मुंबई आणि नागपूरसह 15 वेगवेगळ्या ठिकाणी ईडीने छापेमारी केली असून, या छापेमारीत ईडीच्या अधिकाऱ्यांनी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातून मोठी मालमत्ता जप्त केली आहे.

देशातील अनेक भागांत मागील काही महिन्यांपासून ईडीकडून छापेमारी सुरू आहे. महाराष्ट्रातही मागील काळाता अनेकदा छापेमारी करण्यात आली असून, पुन्हा एकदा महाराष्ट्रात ईडी सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नागपूरसह 15 वेगवेगळ्या ठिकाणी ईडीने छापेमारी केली असून, या छापेमारीत ईडीच्या अधिकाऱ्यांनी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातून मोठी मालमत्ता जप्त केली आहे. (ed search operation in mumbai and nagpur six crore rupees dimond gold and cash recovered)

मिळालेल्या माहितीनुसार, पंकज मेहदिया, लोकेश आणि कथिक जैन यांनी केलेल्या गुंतवणूकदारांच्या फसवणुकीच्या आरोपांप्रकरणी ईडीने छापेमारी केली. त्यानंतर ईडीला 5.51 कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि 1.21 कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली आहे.

- Advertisement -

नेमके प्रकरण काय?

पंकज नंदलाल मेहदिया त्याच्या सहकाऱ्यांसोबत पॉन्झी स्कीम चालवत होता. 2004 ते 2017 या कालावधीत केलेल्या गुंतवणुकीवर टीडीएस कापल्यानंतर 12 टक्के परतावा देण्याचे आश्वासन गुंतवणुकदारांना देण्यात आले होते. या कथित घोटाळ्याचा मुख्य आरोपी पंकज मेहदिया, लोकेश जैन आणि कार्तिक जैन यांचे घर आणि कार्यालयावर ईडीने छापे टाकले. ईडीला या छापेमारीमध्ये 5.51 कोटी रुपयांचे सोनं आणि हिऱ्यांचे दागिने व 1.21 कोटी रुपयांची रोख रक्कम, डिजीटल उपकरणे आणि अनेक आपत्तिजनक दस्तऐवज मिळाली.

- Advertisement -

दरम्यान, या आरोपींवर नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यावरच ईडीने चौकशी सुरू केली. या चौकशीमध्ये ईडीला पंकज मेहदिया आणि त्याचे अन्य सहकारी पॉन्झी स्कीम चालवत असल्याचे समजले.

मिळालेल्या माहितीनुसार पंकज नंदलाल मेहदिया, लोकेश संतोष जैन, कार्तिक संतोष जैन, बालमुकुंद लालचंद कील, प्रेमलता नंदलाल मेहादिया यांच्याविरोधात सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली होती. गुंतवणुकदारांचे कोट्यवधी रुपये बुडल्यामुळे ईडीने चौकशीला सुरूवात केली.


हेही वाचा – ठाण्यात शिवसेनेच्या शाखेवरून राडा; शिवसेना-ठाकरे कार्यकर्ते भिडले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -