घरताज्या घडामोडीमहाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यास आलेल्या ११ जणांचा उष्माघाताने मृत्यू; मुख्यमंत्री शिंदेंची माहिती

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यास आलेल्या ११ जणांचा उष्माघाताने मृत्यू; मुख्यमंत्री शिंदेंची माहिती

Subscribe

नवी मुंबईत महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेल्या ८ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती राज्याजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 'या घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना शासनाकडून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी मुंबईत महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेल्या ११ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ‘या घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना शासनाकडून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, जे उपचार घेत आहेत, त्यांचा संपूर्ण खर्च शासन करणार आहे’, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कामोठे येथील एम जी एम रुग्णालयात उपचारासाठी दाखल १७ रुग्णांची मुख्यमंत्री शिंदे यांनी रात्री आठच्या सुमारास भेट घेतली. “महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील ज्या श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. त्यांची मी विचारपूस केली. या रुग्णांना योग्य उपचार देण्याची सूचना डॉक्टरांना केली आहे. ही दुर्देवी घटना आहे. मनाला वेदना देणारी घटना आहे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

मृत नागरिकांच्या कुटुंबीयांना शासनाकडून ५ लाख रुपयांची मदत

“सोहळ्याच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी काही श्रीसदस्यांवर प्राथमिक उपचार केले. या घटनेत उपचारादरम्यान, ज्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे, त्या श्रीसदस्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृत नागरिकांच्या कुटुंबीयांना शासनाकडून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, जवळपास ५० जण उपचार घेत असून त्यांचा संपूर्ण खर्च शासन करणार आहे”, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

एमजीएम रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समन्वयासाठी पनवेल महापालिकेचा उपआयक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

अकरा जणांचा मृत्यू

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. लाखो लोकांचा या पुरस्कार सोहळ्यात जनसमुदाय आला होता. त्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम सुरळीत पार पडला. परंतु, शेवटी ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सकाळी नवी मुंबईतील खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानात महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. मात्र हा पुरस्कार सोहळा खुले मैदानात आणि दुपारच्या सुमारास झाल्याने अनेकांना उकाड्याचा त्रास सहन झाला नाही. अनेकांना चक्कर आणि थकवा आल्याने उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शेकडोहून अधिक लोकाना उष्माघाताचा त्रास झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी अनेकांना चक्कर आणि थकवा आल्याने उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये श्रीसेवकांचाही समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केल्याची माहिती समोर येत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मृतांना श्रद्धांजली

आज सकाळी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहोळ्यात सहभागी ११ श्रीसदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी या साधकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारमार्फत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जे लोक उपचार घेत आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. स्वतः मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाला भेट देत माहिती घेतली आणि डॉक्टरांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. प्रशासन संपूर्ण समन्वय ठेवून असून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत.


हेही वाचा – महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 100हून अधिक लोकांना उष्माघाताचा त्रास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -