घरमहाराष्ट्रअमित शाह, फडणवीसांच्या भेटीवर खडसे स्पष्टच; म्हणाले, 'मी आता भेटणारच'

अमित शाह, फडणवीसांच्या भेटीवर खडसे स्पष्टच; म्हणाले, ‘मी आता भेटणारच’

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीवरून मागील काही दिवसांपासून बरचं राजकारण रंगतयं. यात अमित शाहांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांची भेट नाकारली. तीन तास खडसे शाहांच्या कार्यालयाबाहेर प्रतिक्षा करत होते. मात्र तरीही एकनाथ खडसे भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

या सर्व राजकीय चर्चांवर एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना भेटणारच आहे. मी कोणत्याही राजकीय कारणांसाठी त्यांना भेटत नसून अन्य विषयासंदर्भात मला भेट घ्यायची आहे. असंही खडसे म्हणाले. खडसे जळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

- Advertisement -

राजकीय वर्तुळातील चर्चांवर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, मी शरद पवार यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मी भेट घेणार आहे. यामध्ये कोणताही राजकीय विषय नाही. अन्य एका विषयासंदर्भात मला दोघांनीही चर्चा करायची आहे. अमित शाहांना भेटायला जाताना शरद पवारच माझ्यासोबत असणार आहेत. त्यामुळे मी भाजपात जाणार आहे. अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका, मी 50 खोके दुसऱ्या पक्षात जाणारा माणूस नाही.

खडसे पुढे म्हणाले की, अमित शाहांची भेट घेण्यासाठी मी त्यांच्या कार्यलायबाहेर तीन तास थांबलो, असं विधान गिरीश महाजनांनी केलं आहे. ही माहिती रक्षाताई खडसेंनी आपल्याला दिल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला. मात्र याबाबत मी रक्षताईंशी चर्चा केली पण त्यांनी अशी कुठलीही माहिती दिली नाही. त्यांना केवळ एवढचं सांगितलं की, आम्ही अमित शाहांची भेट घ्यायला गेलो होतो. पण आमची भेट झाली नाही. विशेष म्हणजे अमित शाहांची भेट घेण्याबाबत पूर्वकल्पना मी शरद पवारांना आधीच दिली होती. गर्दीमुळे तुमची भेट झाली नसेल तर मी स्वत: तुमच्यासोबत येतो. आपण दोघे जाऊन अमित शाहांची भेट घेऊ असही शरद पवारांची मला सांगितलं त्यामुळे याबाबत गैरसमज होण्याचा प्रश्नचं नाही असही खडसे म्हणाले.


राहुल गांधींची भर पावसात सभा; शरद पवारांच्या ‘त्या’ सभेची झाली आठवण


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -