घरताज्या घडामोडीगडचिरोलीतील चकमकीत जखमी झालेल्या पोलीसांची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली भेट

गडचिरोलीतील चकमकीत जखमी झालेल्या पोलीसांची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली भेट

Subscribe

उपचारात काहीही कमी पडू न देण्याची ग्वाही

गडचिरोलीतील कोरची येथील जंगलात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या ४ पोलिस जवानांची सोमवारी गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. रवींद्र नैताम, सर्वेश्वर आत्राम, महारू कुडमेथे आणि टिकाराम कतांगे अशी या जखमी पोलिस जवानांची नावे असून त्यांच्यावर नागपूर येथील ऑरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शनिवारी झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांच्या सी ६० पथकाच्या जवानांनी २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. या कारवाईत ४ पोलिस जवानही जखमी झाले होते. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरमधून नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची भेट आज  शिंदे यांनी घेऊन विचारपूस केली, तसेच त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशीही संवाद साधून उपचारांबाबत माहिती घेतली. लवकरच हे पोलिस जवान बरे होतील,असा विश्वास व्यक्त करतानाच आवश्यकता भासल्यास मुंबईत पुढील उपचारांसाठी नेण्याची व्यवस्थाही शासन करेल,असे शिंदे यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

या कारवाईमुळे नक्षलवादी चळवळीला जबर तडाखा बसला असून नक्षलवाद्यांविरोधातील कठोर कारवाई यापुढेही सुरू राहील, असे  शिंदे यांनी स्पष्ट केले. गडचिरोलीत मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून अनेक नक्षलवादी आणि गडचिरोलीतील तरुण मुख्य प्रवाहात सहभागी होतील, असा विश्वासही  शिंदे यांनी व्यक्त केला.

काय आहे प्रकरण ?

गडचिरोलीतील ग्यारापत्ती जंगलात माओवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत पोलिसांनी आतापर्यंत २६ माओवाद्यांचा खात्मा केला आहे. या चकमकीत ३ जवान गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई पोलिसांकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० या युनिटने ही कामगिरी केली आहे.

- Advertisement -

 


हे ही वाचा – Amravati Violence: भाजप नेते अनिल बोंडे यांना जामीन मंजूर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -