घरमहाराष्ट्रVideo : मा..#* संजय राऊत तू यापुढे..; राऊतांना प्रत्युत्तर देताना गायकवाडांचा तोल सुटला

Video : मा..#* संजय राऊत तू यापुढे..; राऊतांना प्रत्युत्तर देताना गायकवाडांचा तोल सुटला

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून शिंदे गटातील नेते एकामागोमाग एक वादग्रस्त विधान करत आहेत. अलीकडेच शिंदे गटाचे आमदार आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाशळ केली होती. शिंदे गटाचेच दुसरे आमदार गुलाबराव पाटील यांनीही शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांची बेताल विधानांना कुठेच लगाम लागत नसल्याचे दिसेतय. या घटना ताज्या असताना आता शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना आमदार संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांसमोर थेट गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली आहे. गायकवाडांनी शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ आता समोर असून तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

- Advertisement -

संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यादरम्यान शिंदे गटावर टीका केली होती. चित्रपटांमध्ये जसं अमिताभ बच्चन यांच्या हातावर मेरा बाप चोर है, असं कोरलं होतं, तसंच शिंदे गटाच्या आमदारांच्या कपाळावर गद्दार असं कोरलं आहे. याचा त्रास त्यांना पुढील अनेक पिढ्यांपर्यंत होईल, अशी जहरी टीका राऊतांनी केली, राऊतांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना आज संजय गायकवाडांचा तोल घसरला आणि राऊतांना थेट शिवी दिली.

- Advertisement -

राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले की, आमच्यावर गद्दारी केल्याचा आरोप नव्हे तर आम्ही उठाव- क्रांती केल्याचा अभिमान आमच्या पुढच्या पिढ्यांना वाटणार आहे. त्यामुळे मा..#* संजय राऊत तू यापुढे अशी भाषा वापरू नको. राहिला प्रश्न आम्ही लढायचं की पडायचं, तर आमचा निर्णय जनतेला मान्य आहे. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली हातमिळवणी जनतेला मान्य नाही. शिवसेना- भाजपा म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतं. अमिताभ बच्चनचा डायलॉग चित्रपटासाठी ठीक आहे, पण महाराष्ट्रात आमच्या किती जागा निवडून येतात आणि तुमच्या किती निवडून येतात ते आपण बघू. असं अप्रत्यक्ष आव्हानचं त्यांनी ठाकरे गटाला दिले आहे.


‘हा’ विषय संपवावा लागेल, उदयनराजेंनी राज्यपालांच्या घेतलेल्या भूमिकेवरून पाटलांनी जोडले हात

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -