घरताज्या घडामोडीविधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीवर राज्यपालांची सकारात्मक भूमिका, एकनाथ शिंदेंची माहिती

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीवर राज्यपालांची सकारात्मक भूमिका, एकनाथ शिंदेंची माहिती

Subscribe

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या शिष्ट मंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीची तारीख निश्चित करण्यासाठी चर्चा करण्यास महाविकास आघाडीचे नेते गेले होते. राज्यपालांना पत्र दिले असून चर्चा सकारात्मक झाली असल्याची माहिती शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर सकारात्मक असून ते निर्णयही सकारात्मक देतील अशी अपेक्षा असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आमदार सतेज पाटील उपस्थित होते. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याची भूमिकासुद्धा सकारात्मक असल्यामुळे उत्तरही सकारात्मक येईल अशी अपेक्षा असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

राज्यपालांना वाटेल त्या तारखेला निवडणूक घेऊ – भुजबळ

विधानसभा अध्यपदाची निवडणुकीसाठी ९ तारखेची परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. त्यांना जी तारीख वाटेल त्या तारखेला विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेऊ घेऊ असे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. आम्ही त्यांना विनंती केली आहे. की, १२ आमदार आहेत, लोकशाहीत बहुमताच्या सरकारचे महत्त्व असते, राज्यपालांना लवकर न्याय देऊन विधान परिषदेच्या सभागृहात लोकांची सेवा आणि लोकांच्या प्रश्नाच्याबाबत न्याय देण्याची संधी द्यावी अशी विनंती केली आहे.

- Advertisement -

ओबीसी आरक्षणावर राज्यपालांशी चर्चा नाही

राज्यापालांच्या अभिभाषणावर चर्चा झाली नाही. परंतु विधानसभा अध्यक्षपदाची निवड होऊ नये असा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपचे लोकं हायकोर्टात गेले होते परंतु कोर्टाने त्यांना फटकार लावली आहे. हायकोर्टात यायचे असेल तर पैसे भरा असे कोर्टाने सांगितले आहे. तसेच विधान परिषदेचा निर्णय विधान परिषदेत करा असे हायकोर्टाच्या निर्णयात सांगण्यात आले असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.


हेही वाचा : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये, विधानमंडळात सोमवारी विधेयक मांडणार- अजित पवार

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -