घरताज्या घडामोडीकोकण विभागीय विकास प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकोपयोगी कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यास मदत होईल...

कोकण विभागीय विकास प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकोपयोगी कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यास मदत होईल – एकनाथ शिंदे

Subscribe

शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कोकण विभागीय माहिती कार्यालयातर्फे भरविण्यात आलेल्या विकास प्रदर्शनाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकाराने गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी येथे व्यक्त केला.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित विकास प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी पालकमंत्री शिंदे बोलत होते. येथील नुतनिकृत टाऊनह़ॉलमध्ये प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, निरंजन डावखरे, संजय केळकर, ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, निवासी उप जिल्हाधिकारी सुदाम परदेशी, माहिती व जनसंपर्क विभागाच्या कोकण विभागाचे उपसंचालक डॉ. गणेश मुळे, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

किल्ल्याच्या तटबंदीप्रमाणे हुबेहुब उभारलेल्या या प्रदर्शनात शासनाचे महत्वपूर्ण उपक्रम व माहिती सुंदर रंगसंगती असलेल्या चित्रफलकांतून मांडण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांत शासनाने कोरोना सारख्या कठीण काळात केलेली कामगिरी, कृषी, आदिवासी विकास, शिवभोजन, महाआवास योजना, आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासह समाजातील सर्वच घटकांचा सर्वांगिण विकास याबाबत सचित्र माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. संपूर्ण प्रदर्शनाची पाहणी करीत पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी पालकमंत्र्यांसह खासदार विचारे, आमदार डावखरे, फाटक,केळकर, जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी प्रदर्शनाविषयी आवर्जून अभिप्राय नोंदविले. यावेळी विभागीय उपसंचालक डॉ. मुळे यांनी पालकमंत्र्यांसह मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मान्यवरांना प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या विविध विभागांच्या पॅनल विषयी त्यांनी माहिती दिली.

- Advertisement -

प्रदर्शन १ ते ५ मेपर्यंत

ठाण्याचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या टाऊन हॉलमध्ये ५ मे २०२२ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे. त्या माध्यमातून नागरिकांनी शासकीय योजनांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन उपसंचालक डॉ. मुळे यांनी केले आहे.


हेही वाचा : कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा मास्कसक्ती करावी लागेल, राजेश टोपेंचा इशारा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -