घरमहाराष्ट्रशिंदेंच्या 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षाला 'ढाल तलवार' चिन्ह

शिंदेंच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाला ‘ढाल तलवार’ चिन्ह

Subscribe

केंद्रीय निवडणुक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाला ‘ढाल- तलवार’ हे चिन्ह वापरण्यास परवानगी दिली आहे. काल आयोगाने शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिले होते. मात्र त्यांनी दिलेली चिन्हं अमान्य करत त्यांना नव्याने तीन चिन्ह देण्याचे निर्देश दिले. ज्यानंतर शिंदे गटाने तळपता सुर्य, ढाल- तलावार, पिंपळाच झाडं हे तीन पर्याय निवडणूक आयोगाकडे पाठवले होते. ज्यातील ढाल – तलवार हे चिन्ह वापरण्यास शिंदे गटाला परवानगी दिली आहे.

आयोगाने काल शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिलं, मात्र उगवात सूर्य, त्रिशुळ आणि तिसरे गदा ही पर्यायी चिन्हं निवडणूक आयोगाने नाकारली. यातील गदा आणि त्रिशुळ हे चिन्ह धार्मिक असल्याचे सांगत शिंदे गटाला आयोगाने हे चिन्ह वापरण्यास परवानगी नाकारली. तर उगवता सूर्य हे चिन्ह तामिळनाडूमधील एका पक्षाचे असल्याचे तेही आयोगाने नाकारले. त्यामुळे शिंदे गटाने आज सकाळी तळपता सुर्य, ढाल- तलावार, पिंपळाच झाडं हे चिन्हांचे पर्याय निवडणूक आयोगाकडे पाठवले ज्यातील ढाल- तलावार हे चिन्ह शिंदे गटाला दिले आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदे गटाने तळपता सूर्य हे चिन्ह मागितले होते. मात्र ते चिन्ह मिझोराम राष्ट्रीय पक्ष आणि द्रमुकशी संबंधित असल्याने ते आयोगाने नाकारले. दरम्यान ढाल तलवार हे चिन्ह पूर्वी पीपल्स डेमोक्रॅटिक मूव्हमेंटकडे होते, मात्र ते पक्ष 2004 ला यादीतून वगळ्यात आले, ज्यानंतर आता शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला दोन तलवार आणि एक ढाल असे चिन्ह मिळालं आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -