घरमहाराष्ट्रनिवडणूक संपली आता वसुली सुरु; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

निवडणूक संपली आता वसुली सुरु; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

Subscribe

वीजबिल वसुलीवरुन देवेंद्र फडणवीस, राजू शेट्टी यांची टीका

वीजबिल वसुलीच्या महावितरणाच्या धोरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. निवडणूक संपली आता वसूली सुरु केली आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. बिल्डर्सना हजारो कोटींची सूट या सरकारने दिली. मात्र, लॉकडाऊन काळात रोजगार गेलेल्या सामान्य माणसाकडून वीज बिल वसूल करण्याचा तुघलकी निर्णय घेणारं हे सरकार आहे, असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.

“ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्याबरोबर आणि त्यामध्ये हार मिळाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात वसुली सुरु केली आहे आणि कनेक्शन कापण्याच्या गोष्टी सुरु आहेत. हजारो कोटींची सूट बिल्डर्सना दिली आहे. पण त्याचवेळी लॉकडाऊन काळात रोजगार नव्हता त्या सामान्य माणसाचे चारपट आलेली बिलं सुधरवण्याऐवजी ते बिल भरलं नाही म्हणुन कनेक्शन कापू अशा प्रकारे तुघलकी निर्णय घेणारं हे सरकार आहे,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

- Advertisement -

मंत्र्यांना गावात फिरु देणार नाही; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी वीजबिल वसुलीवरुन राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. जादा बिलाचा एकही रुपया भरणार नाही. उर्जामंत्र्यांना जे काही करायचं आहे ते करावं. दोन हात करायला आम्ही तयार आहोत, असं राजू शेट्टी म्हणाले. “वीज कनेक्शन तोडून वीज बिल वसुल करु असं जर उर्जामंत्री म्हणत असतील तर महाराष्ट्रातील घरगुती वीजबिल ग्राहक कदापी सहन करणार नाहीत. हिंमत असेल तर सरकारने वीज कनेक्शन तोडण्याचं धाडस सरकारनं करावं. मंत्र्यांनी राज्यभरात दौरे करावे आणि घरगुती वीज ग्राहकांची अवस्था आहे ती बघावी, असं राजू शेट्टी म्हणाले.


हेही वाचा – Maratha Reservation In SC: मराठा आरक्षणाची सुनावणी ५ फेब्रुवारीपर्यंत स्थगित

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -