घरट्रेंडिंगशेतकरी कर्जमाफीसाठी ३२ लाख शेतकऱ्यांची नोंद, २१ फेब्रुवारीला यादी होणार प्रसिद्ध

शेतकरी कर्जमाफीसाठी ३२ लाख शेतकऱ्यांची नोंद, २१ फेब्रुवारीला यादी होणार प्रसिद्ध

Subscribe

शेतकरी कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या २१ फेब्रुवारीपासून जाहीर करण्यात येईल असे ते म्हणाले.

ठाकरे सरकारच्या बहुचर्चित शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी आतापर्यंत एकूण ३२ लाख १६ हजार २७८ शेतकऱ्यांची डेटा पोर्टलवर अपलोड झालेची माहिती समोर आली आहे. यानुसार या योजनेसाठी पात्र असलेल्या ८५ टक्के शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड आहे, तर लवकरच पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. दरम्यान, या योजनेची अंमलबजावणी कशी सुरु आहे, याचा दररोज आढावा मुख्यमंत्री घेणार असल्याचे शुक्रवारी त्यांनी जाहीर केले. तसेच या योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या २१ फेब्रुवारीपासून जाहीर करण्यात येईल असे ते म्हणाले.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारकडून राज्यातील २ लाखापर्यंतचे कर्ज असलेले शेतकऱ्यांना महात्मा जोतीराव फुले ही कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी बैठक बोलाविली होती. या बैठकीत त्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्तीच्या अंमलबाजावणीकडे राज्याचेच नाही तर देशाचे लक्ष आहे. इतक्या अल्पावधीत या कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीची तयारी केली त्यासाठी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन देखील केले. तर कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीची तयारी करतांना येणाऱ्या लहान लहान तांत्रिक समस्यांचेही निराकरण करणे महत्वाचे. कर्जमुक्ती म्हणजे आपण शेतकऱ्यांवर उपकार करीत नसून त्यांचे आशीर्वाद घेतो आहोत अशा भूमिकेतून मदत करावी असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

योजनेतील पात्र शेतकऱ्यांपैकी ९५ टक्के आधार जोडणी पूर्ण झाली असून, यासाठी सर्व बँकांचे संपूर्ण सहकार्य मिळाले आहेत. २१ फेब्रुवारीपासून गावोगाव याद्यांची प्रसिद्धी आणि आधार प्रमाणीकरण सुरू होणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. तर ११ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष यंत्रणा कशी काम करते याची पडताळणी सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -