घरमुंबईपरमबीर सिंह यांची बदली रुटीन नव्हती, गृहमंत्र्यांनी सांगितले बदलीचे कारण

परमबीर सिंह यांची बदली रुटीन नव्हती, गृहमंत्र्यांनी सांगितले बदलीचे कारण

Subscribe

अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकांचा परिणाम आम्हाला भोगावा लागत आहे. - गृहमंत्री

सचिन वाझे प्रकरणाची चौकशी निःपक्षपाती व्हावी यामुळे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करुन गृह रक्षक विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मुंबई पोलीस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परमबीर सिंह यांच्या नेतृत्वात सचिन वाझे काम करत आहेत. एनआयए आणि एटीएस मनसुख हिरेन आणि अंबानी स्फोटक प्रकरणात तपास करत आहेत. पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्या नेतृत्वात करत होते. सचिन वाझे सरळ परमबीर सिंह यांना रिपोर्ट करत होते. यामुळे एनआयएच्या तपासात कोणतीही बाधा येऊ नये यासाठी आयपीएस लॉबीत राज्य सरकारने मोठे बदल केले आहेत. असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमादरम्यान म्हटले आहे.

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत अधिक माहिती माध्यमांसमोर देऊ शकत नाही परंतु चौकशीत तथ्य आढळल्यानंतरच कारवाई केली असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या या रुटीन बदल्या नव्हत्या अधिकाऱ्यांकडून काही चुका झाल्यांमुळेच बदलीचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी केलेल्या त्या चुका माफ करण्याजोग्या नाहीत. परंतु अधिकाऱ्यांवनी केलेल्या चुकांचा परिणाम आम्हाला भोगावा लागत आहे. सचिन वाझे प्रकरणात एनआयए चौकशी करत आहे. राज्य सरकार आणि मुंबई पोलीस देखील या तपास यंत्रणांना चौकशी करण्यासाठी मदत करत असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. एनआयए आणि एटीएस योग्य तपास करुन दोषींवर कडक कारवाई करेल.

- Advertisement -

माझ्यावर कोणाचाही दबाव नाही – गृहमंत्री

गृहमंत्र्यांना मुलाखतीदरम्यान तुमच्यावर कोणाचा दबावा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला यावर प्रत्युत्तरात अनिल देशमुख यांनी म्हटले आहे की, माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. मी मागील ३० वर्षांपासून राजकारणात आहे. मागील ३० वर्षात माझ्यावर एकाही प्रकरणाचा किंवा कारस्थानाचा ठपका नाही आहे. त्यामुळे माझ्यावर आणि गृहखात्यावर कोणाचाही दबाव नाही असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील चमेलीचे तेल लावून येतात – गृहमंत्री

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील आणखी दोन मंत्री राजीनामा देतील असे वक्तव्य केले होते. परंतु मुंबई पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली. या प्रश्नावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तर देत म्हटले आहे की, चंद्रकांत पाटील कोणते तेल लावून येतात आणि वक्तव्य करत असतात. चंद्रकांत पाटील चमेलीचे तेल लावून येतात असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

सरकार स्थिर विरोधकांनी स्वप्न बघणे बंद करावे – गृहमंत्री

विरोधाकाकडू सरकार पडणार असल्याचे वक्तव्य होत असते यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे की, पुढील पाच वर्षात सरकारला कोणीही पाडू शकणार नाही. तीन पक्षांचे सरकार अत्यंत स्थिर आणि उत्तम काम करत आहे. ‘विरोधकांनी मुंगेरी लाल के सपने देखना बंद करना चाहिए’ असे वक्तव्य गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -