घरताज्या घडामोडीनाणार प्रकल्पाचं समर्थन करणाऱ्या सेनेच्या जि. प. सदस्याची पक्षातून हकालपट्टी

नाणार प्रकल्पाचं समर्थन करणाऱ्या सेनेच्या जि. प. सदस्याची पक्षातून हकालपट्टी

Subscribe

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नाणारला समर्थन करणाऱ्या मंदा शिवलकर यांना पक्षातून काढून टाकल्याची घोषणा केली. इतरांना शेवटची संधी असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणच्या दौऱ्यावेळी नाणार रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असेल, असे जाहिर केले होते. मात्र, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर लगेचच शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन नाणार प्रकल्पाचे समर्थन केले. पक्षाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. शिवसेना विभागप्रमुख राजा काजवे यांना हटवल्यानंतर आता सेनेच्या जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांचीसुद्धा पक्षातून हकालपट्टी केली आहे.

शिवसेनेचे काही पदाधिकारी आणि शिवसैनिक नाणार प्रकल्पाच्या समर्थनार्थ १७ फेब्रुवारी रोजी रस्त्यावर उतरले होते. यामध्ये राजा काजवे, मंदा शिवलकर यांच्यासह सेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यानंतर पक्षाने विभागप्रमुख राजा काजवे यांच्यावर कारवाई केली होती. राजा काजवे यांच्यानंतर आता मंदा शिवलकर यांचीसुद्धा पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भारत हे धार्मिक सद्भावनांसाठी नंदनवन.. हा घ्या पुरावा!


शिवसेनेने नाणार प्रकल्पाच्या विरोधकांचा निर्धार मेळावा घेतला. या मेळाव्यात नाणार प्रकल्प होणार नाही, अशी भूमिका घेतली. यावेळी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नाणारला समर्थन करणाऱ्या मंदा शिवलकर यांना पक्षातून काढून टाकल्याची घोषणा केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानूसार हा निर्णय घेण्यात आला असे राऊत म्हणाले. यासह इतर शिवसैनिकांना सुद्धा शेवटची संधी दिली जात असून उद्या होणाऱ्या नाणार प्रकल्पाच्या समर्थन मेळाव्यात कोणताही शिवसैनिकाने तिथे उपस्थित राहू नये. जर कोणी तिथे आढळून आला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.


हेही वाचा – मोदींना नागरिकत्व प्रमाणपत्राची गरज नाही – माहिती अधिकारात पीएमओचं उत्तर!

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -