घरमहाराष्ट्रपरमबीर सिंह, डीसीपी, एसीपींसह सहा पोलीस अधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा

परमबीर सिंह, डीसीपी, एसीपींसह सहा पोलीस अधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा

Subscribe

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील आरोपांमध्ये वाढ होत आहे. त्यांच्यावर आता खंडणी गोळा करणे आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. एवढंच नव्हे तर परमबीर सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. बांधकाम व्यवसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केस मागे घेण्यासाठी बांधकाम व्यवसायिकाकडून खंडणी मागितल्याचा आरोप परमबीर सिंह, अकबर पठाण यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी श्यामसुंदर अग्रवाल हा असून ठाण्यातील बांधकाम व्यवसायिक आहे. अग्रवाल यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंह, डीसीपी अकबर पठाण, एसीपी श्रिकांत शिंदे , पीआय आशा कोरके, पीआय नंदकुमार गोपाले, पोलीस अधिकारी संजय पाटील, सुनील जैन आणि संजय पनामिया आणि संबंधित पोलीस अधिकारी यांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक २९९/२१, कलम३८७, ३८८, ३८९, ४०३, ४०९, ४२०, ४२३, ४६४, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०(b), १६६, १६७, १७७, १८१, १८२, १९३, १९५, २०३, २११, २०९, २१०, ३४७, १०९, ११०,१११,११३ भा. द. वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. नमूद गुन्ह्यातील २ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या

परमबीर सिंह यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (Anti Corruption Bureau) परमबीर सिंह यांची खुली चौकशी करण्यासंबंधी आदेश दिले आहेत. पोलीस अधिकारी अनुप डांगे यांच्या तक्रारीसंदर्भात चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अनुप डांगे यांनी परमबीर सिंह यांचे पब मालकाशी असलेले संबंध आणि त्यांच्यावर टाकण्यात आलेल्या दबावाप्रकरणी, तसेच भष्टाचाराप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होती. तक्रारीनंतर हे प्रकरण महासंचालक संजय पांडे यांच्याकडे चौकशीसाठी सुपूर्त करण्यात आलं होतं. पण त्यांनी याप्रकरणी चौकशीला नकार दिल्यानंतर आता एका समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. याशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही (एसीबी) याप्रकरणी डिस्क्रीट इन्क्वायरीला (गोपनीय चौकशी) सुरूवात केली होती. चौकशीत पुढे आलेल्या काही तथ्यांनंतर याप्रकरणी खुली चौकशी करण्यासाठी एसीबीने गृहविभागाकडे मागणी केली होती, त्यानुसार त्यांना आता परवानगी मिळाली आहे. यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अनुप डांगे यांनी यांनी काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारला पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी एका व्यक्तीने परमबीर सिंह यांचा नातेवाईक असल्याचं सांगत त्यांच्याकडे संपर्क साधला आणि पोलीस दलात पुन्हा रुजु करण्यासाठी २ कोटी रुपये मागितल्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -