घरCORONA UPDATEव्हॉट्सअॅपच्या 'त्या' मेसेजवर विश्वास ठेऊ नका, फेक आहे!

व्हॉट्सअॅपच्या ‘त्या’ मेसेजवर विश्वास ठेऊ नका, फेक आहे!

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर एक मेसेज व्हायरल होऊ लागला आहे. यामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली, तर त्याच्या कंपनीविरोधात एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. राज्य सरकारने घेतलेल्या विशेष बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचं देखील या व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये म्हटलं आहे. मात्र, आता त्यावर खुद्द राज्य सरकारनेच खुलासा केला आहे. सरकारचा असा कोणताही निर्णय नसून हा मेसेज एखाद्या दुसऱ्या राज्याच्या संदर्भात असावा, असं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं आहे. त्यामुळे हा व्हॉट्सअॅप व्हायरल मेसेज फेक असल्याचंच स्पष्ट झालं आहे. न्यू इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

व्हॉट्सअॅपवर हा मेसेज कुठून आला असावा, याविषयी अधिक खोलात गेल्यानंतर एका खासगी वेबसाईटवर सामान्य प्रश्नांना दिलेल्या उत्तरांमधून (FAQ) हा गोंधळ झाल्याचं स्पष्ट झालं. दोन प्रश्नांमध्ये गल्लत करून त्यातून तिसराच अर्थ काढल्यामुळे हा गोंधळ झाला.

- Advertisement -

fake massege

दरम्यान, हा मेसेज व्हायरल होऊ लागल्यानंतर राज्याच्या गृह विभागाने ट्वीटरवर यासंदर्भातला खुलासा केला आहे. गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांचा चुकीचा अर्थ काढून हा मेसेज तयार करण्यात आला आहे. जर मालकाच्या बेजबाबदारपणामुळे सोशल डिस्टन्सिंग किंवा लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन झालं, तर त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात येईल, असं स्पष्टीकरण गृहविभागानं दिलं आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -