घरताज्या घडामोडीप्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचं निधन

प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचं निधन

Subscribe

प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचं निधन झालं. सांगलीतील दुधगावात वृद्धापकाळने इलाही जमादार यांच निधन झालं असून वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक दिवसांपासून इलाही जमादार आजाराने त्रस्त होते. त्याच्या निधनाने गझल विश्वात शोककळा पसरली आहे. उद्या (सोमवारी) सकाळी १०.०० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.

इलाही जमादार यांचा जन्म सांगलीतील दुधगावात १ मार्च १९४६ रोजी झाला होती. उत्तुंग गझलकार सुरेश भटांच्यानंतर इलाही जमादार यांचं नाव घेतलं जात. गझल क्षेत्रामध्ये इलाही जमादार यांचं मोठं नाव होत. १९६४ सालापासून त्यांनी काव्यलेखनाला सुरुवात केली होती. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी अशी त्यांची विशेष ओळख होती. मराठी, हिंदी, उर्दू या भाषेमधील अनेक दैनिक आणि मासिकांतून इलाही जमादार यांच्या कविता आणि गझल प्रसिद्ध झाल्या. नवोदित मराठी कवींसाठी ते गझल क्लिनिक ही गझल कार्यशाळा घेत होते.

- Advertisement -

‘इलाही गेले हे खूप मोठं दुःख आहे. कारण आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये मराठी गझल नावाची जी गोष्ट आहे. ती सुरेश भट जशी सादर करायचे त्यानंतर भीमराव पांचाळेच पर्व सुरू झालं. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाच नाव इलाही जमादार होत. अंदाज आरशाचा, वाटे, खरा असावा बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा ही त्यांची गझल लाखो लोकांच्या ओठावर आहे. भीमराव पांचाळे यांनी बऱ्याच जणांच्या गझाल गायल्या आहेत. पण इलाही यांची ही गझल भीमराव पांचाळे हे प्रत्येक कार्यक्रमात घेत असतं. त्यांचा कोणत्याही कार्यक्रमात इलाही यांची गझल असायची. खूप साधं व्यक्तिमत्त्व होत आणि खूप सोप्या भाषेत इलाही लिहित होता. त्याच्यामुळे लोकांना ते आवडायचं आणि पटायचं.’ – अरुण म्हात्रे, ज्येष्ठ कवी


हेही वाचा – अभिनेता शर्मन जोशीच्या वडिलांचे निधन

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -