मच्छिमारांचा नेता हरपला, दामोदर तांडेल यांचे कोरोनामुळे निधन

अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष आणि मच्छिमारांची बाजू सतत लावून धरणारे लढवय्ये कामगार नेते दामोदर तांडेल यांचे निधन.

fighting fisherman leader damodar tandel dies
मच्छिमारांचा नेता हरपला, दामोदर तांडेल यांचे कोरोनामुळे निधन

अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष आणि मच्छिमारांची बाजू सतत लावून धरणारे लढवय्ये कामगार नेते दामोदर तांडेल यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी पूनम, दोन मुले, दोन सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

दामोदर तांडेल यांच्याविषयी…

दामोदर तांडेल यांचे मूळ गाव पालघर असून त्यांची कर्मभूमी मुंबई होती. दक्षिण मुंबईतील कफ परेडच्या मच्छिमार नगरात ते राहत होते. हिंदुस्तान लिव्हर कंपनीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपले पुढील आयुष्य मच्छिमारांना न्याय मिळवून देण्यासाठी वाहिले. ते हिंदुस्तान लिव्हरमध्ये कामगार संघटनेचे नेते होते.

एक धडाडीचा मच्छिमार समाजाचा शासन दरबारी आवाज उठविणारा ख्यातनाम कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला. हे कळताच कोळी बांधवांमध्ये दु:खाली लाट पसरली आहे. त्यांनी शासनाच्या एलईडी फिशिंग धोरणाविरुद्ध कोर्टात उभारलेल्या लढ्याच्या कार्याच्या स्मृती समाजाच्या चिरकाल स्मरणात राहतील, अशा शब्धात महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो आणि सरचिटणीस किरण कोळी यांनी समितीच्या तमाम मच्छिमारांतर्फे श्रद्धांजली वाहिली.


हेही वाचा – भाजपास पुन्हा सुतक, ‘सामना’तून टीका